esakal | स्विमिंग पूलमध्ये अधिकाऱ्यासोबत लैंगिक चाळे, महिला कॉन्स्टेबलला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

स्विमिंग पूलमध्ये अधिकाऱ्यासोबत लैंगिक चाळे, महिला कॉन्स्टेबलला अटक

स्विमिंग पूलमध्ये अधिकाऱ्यासोबत लैंगिक चाळे, महिला कॉन्स्टेबलला अटक

sakal_logo
By
दीनानाथ परब

जयपूर: राजस्थान पोलीस (Rajasthan police) दलातील अनैतिक संबंधांच (extra marital affair) एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. दोन व्हिडीओ क्लिपमध्ये (Video clip) राजस्थान पोलीस दलातील अधिकाऱ्याबरोबर लैंगिक वर्तन करताना दिसलेल्या निलंबित महिला पोलीस कॉन्स्टेबलला रविवारी स्पेशल ऑपरेशन ग्रुपने (SOG) अटक केली. न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिला १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एसओजीच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

"कालवार भागातील काकांच्या घरातून या कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली. पॉस्को कायद्याच्या विविध कलमांखाली तिला अटक करण्यात आली असून तिची चौकशी करण्यात येईल" अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. १० जुलैला अजमेर जिल्ह्यातील पुष्कर शहरातील एका आलिशान रिसॉर्टमध्ये महिला कॉन्स्टेबलच्या मोबाइलमधुन या व्हिडीओ क्लिप शूट करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: नवाब मलिक यांचा सोमय्यांच्या मुलावर खंडणी वसुलीचा आरोप

अजमेर जिल्ह्यातील ब्यावर सर्कल येथे आरपीएस अधिकारी हीरा लाल सैनी तैनात होते. महिला कॉन्स्टेबल जयपूर येथे तैनात होती. महिला कॉन्स्टेबलचा बर्थ डे साजरा करण्यासाठी ते पुष्करमधील एका रिसॉर्टमध्ये गेले होते. "रिसॉर्टच्या रुमशी जोडलेल्या खासगी स्विमिंग पुलमध्ये दोघे लैंगिक चाळे करत होते. त्यावेळी महिलेचा सहा वर्षाचा मुलगाही तिथे होता" असे एसओजीमधील सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा: छगन भुजबळ नसल्याने OBC आरक्षणासंदर्भातली महत्त्वाची बैठक रद्द

"महिलेने तिच्या मोबाइलच्या स्वतंत्र फोल्डरमध्ये ही व्हिडीओ क्लिप सेव्ह करुन ठेवली होती. पण तिच्याही नळकतपणे ती क्लिप व्हॉट्स अ‍ॅप स्टेटसवर पोस्ट झाली. ही क्लिप तिच्या नवऱ्याने आणि अन्य नातेवाईकांनी पाहिली" असे स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या अधिकाऱ्याने सांगितले.

सैनी आणि महिला कॉन्स्टेबलशिवाय कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी अन्य दोन आरपीएस अधिकारी, दोन पोलीस ठाण्याचे एसएचओंना निलंबित करण्यात आले आहे. महिला कॉन्स्टेबलच्या नवऱ्यानेच दोघांविरोधात पॉस्को कायद्यातंर्गत तक्रार दाखल करण्याची मागणी केली होती. पण पोलिसांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अधिकाऱ्यांना विविध स्तरावर या प्रकरणाची माहिती होती. पण तरीही त्यांनी कारवाई केली नाही, म्हणून अन्य अधिकाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे.

loading image
go to top