Rajasthan : कॉंग्रेस नेतृत्वाचा गेहलोतांच्या निकटवर्तीयांना झटका! पाठवली नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashok Gehlot

Rajasthan : कॉंग्रेस नेतृत्वाचा गेहलोतांच्या निकटवर्तीयांना झटका! पाठवली नोटीस

Rajasthan Political Crisis : राजस्थान काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळानंतर आता पक्षानेही कारवाईचा बडगा उगारला आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर प्रभारी अजय माकन आणि पर्यवेक्षक मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी (२७ सप्टेंबर) सोनिया गांधी यांना संपूर्ण घटनेचा अहवाल सादर केला. त्यानंतर काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने गेहलोत यांच्या जवळच्या नेत्यांना शिस्त मोडल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

काँग्रेसने गेहलोत यांचे निकटवर्तीय संसदीय कामकाज मंत्री शांती धारिवाल, चीफ व्हिप महेश जोशी आणि आरटीडीसीचे अध्यक्ष धर्मेंद्र पाठक यांना नोटीस पाठवून दहा दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. सोनिया गांधींना पाठवलेल्या त्यांच्या नऊ पानी अहवालात निरीक्षकांनी आमदारांच्या प्रस्तावित बैठकीऐवजी वेगळी जमवाजमव करणे ही गंभीर शिस्तभंगाचा प्रकार असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा: SCच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'हा धक्का नाहीये..'

रविवारी विधिमंडळाच्या बैठकीपूर्वी गेहलोत समर्थकांनी शांती धारीवाल यांच्या घरी बैठक घेतली. या बैठकीत या आमदारांनी सचिन पायलट यांनी अशोक गेहलोत यांच्या विरोधात 2020 मध्ये केलेल्या बंडाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी सरकारला पाठिंबा देणाऱ्यांमधूनच मुख्यमंत्री निवडला जावा, असे आमदारांचे म्हणणे होते. सचिन पायलट यांना सर्वोच्च पदापासून दूर ठेवण्याच्या निषेधार्थ त्यांनी सभापती सीपी जोशी यांच्याकडे सामूहिक राजीनामा सादर केला.

हेही वाचा: Flipkart Sale : iPhone 13 च्या ऑर्डर आपोआप रद्द होतायत? कंपनी म्हणतेय की..