Flipkart Sale : iPhone 13 च्या ऑर्डर आपोआप रद्द होतायत? कंपनी म्हणतेय की.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

iphone 13 orders being cancelled on flipkart big billion day sale 2022 check all details here

Flipkart Sale : iPhone 13 च्या ऑर्डर आपोआप रद्द होतायत? कंपनी म्हणतेय की..

ई-कॉमर्स वेबसाइट अमेझॉन आणि फ्लिपकार्टचा फेस्टिव्हल सेल 23 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना iPhone च्या लेटेस्ट मॉडेल तसेच iPhone 13 वर अनेक चांगल्या ऑफर्स मिळत आहेत. सेल दरम्यान, आयफोन 13 ची विक्री देखील झाली. अनेक ग्राहकांनी सेलमध्ये 70 हजार किमतीचे आयफोन 13 देखील 42,619 रुपयांच्या कमी किमतीत खरेदी केले. मात्र आता आयफोनची ऑर्डर रद्द केल्याने ग्राहक चिंतेत आहेत. फ्लिपकार्ट त्यांना न कळवता त्यांच्या ऑर्डर्स रद्द करत असल्याच्या तक्रारी यूजर्स सातत्याने करत आहेत.

फ्लिपकार्टचं म्हणणं काय?

या प्रकरणावर अमर उजालाने दिलेल्या रिपोर्टनुसार, फ्लिपकार्टच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही नेहमीच ग्राहकांच्या आवडींचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही देशभरात जवळपास 70 टक्के आयफोन ऑर्डर वितरित केल्या आहेत आणि उर्वरित वितरित केल्या जात आहेत. सेलरकडून काही कारणास्तव केवळ 3% ऑर्डर रद्द केल्या आहेत.

अपोआप कॅन्सल होतायत ऑर्डर

सध्या iPhone 13 (128 GB) Amazon आणि Flipkart या दोन्हींवर स्टॉकमध्ये नाही. केवळ आयफोनचा स्टॉक संपला नाही तर ज्या वापरकर्त्यांनी फ्लिपकार्टवरून आयफोन 13 (128 जीबी) ऑर्डर केली होती त्यांच्यापैकी अनेकांच्या ऑर्डर आपोआप रद्द झाल्या आहेत. यानंतर अनेक युजर्सनी ट्विटरवर फ्लिपकार्टवर टीकाही केली. मात्र, अॅपलने अद्याप या मॉडेलच्या स्टॉकबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. iPhone 13 मध्ये तीन स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहेत, ज्यात 128 GB, 256 GB आणि 512 GB स्टोरेज व्हेरिएंट आहेत.

हेही वाचा: मारुतीची नवीन स्वस्त SUV लॉंच, किंमत पाहून होईल विकत घेण्याची इच्छा

वापरकर्त्यांचा संताप

फ्लिपकार्ट सेलच्या नावाखाली फसवणूक करत असून केवळ मार्केटिंगसाठी बनावट सेल दाखवून लोकांना त्रास देत असल्याचे युजर्सचे म्हणणे आहे. अनेक युजर्सनी यासाठी फ्लिपकार्टवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. आयफोन 13 विकत घेतलेल्या अनेक वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर फ्लिपकार्टकडे रिफंड आणि ऑर्डर रद्द केल्याबद्दल तक्रार केली आहे.

हेही वाचा: बाळासाहेबांची सावली अशी ओळख असणारा चंपासिंह थापा देखील शिंदे गटात