‘बरं झालं माझ्या जातीला आरक्षण नाही’; नितीन गडकरींची भावना

टीम ई-सकाळ
Monday, 16 September 2019

नागपूर : आपल्या मिश्कील वक्तव्यांमुळे अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हशा पिकवणारे केंद्रातील अभ्यासू मंत्री नितीन गडकरी एका वक्तव्यामुळे आज पुन्हा चर्चेत आले आहेत. गडकरी यांनी आरक्षणावर भाष्य केले असून, आपल्या जातीला आरक्षण नसल्यामुळं सुदैवी असल्याचं म्हटलंय. 

नागपूर : आपल्या मिश्कील वक्तव्यांमुळे अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हशा पिकवणारे केंद्रातील अभ्यासू मंत्री नितीन गडकरी एका वक्तव्यामुळे आज पुन्हा चर्चेत आले आहेत. गडकरी यांनी आरक्षणावर भाष्य केले असून, आपल्या जातीला आरक्षण नसल्यामुळं सुदैवी असल्याचं म्हटलंय. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते. आरक्षण नसल्यामुळेच आज मी इथवर पोचलो, असेही गडकरी म्हणाले.

शिवसेनेचा पुन्हा 'जय श्रीराम'चा नारा

नोकरी देणारा व्हायचं होतं
नागपुरात अखिल माळी समाजाच्या महाअधिवेशनाला नितीन गडकरी प्रमुख उपस्थित होते. तसेच उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनाही विशेष आमंत्रित करण्यात आले होते. अर्थात गडकरी यांच्या भाषणाने या कार्यक्रमात रंगत आली. त्यात त्यांना आरक्षणावर भाष्य करत आपण सुदैवी असल्याचं म्हटलंय. गडकरी म्हणाले, ‘आमच्या जातीला आरक्षण नाही, हे बरंय. कारण, आरक्षण असतं तर, मी कुठं तरी सरकारी बाबू म्हणून काम करत असतो. घरच्यांना मी कायम सांगत होतो. मला नोकरी करणारा व्हायचं नाही तर, नोकरी देणारा व्हायचं आहे.

‘हिंदी’ ट्विटवरून अमित शहांचा कमल हसन यांनी घेतला समाचार

ज्यांचे मंत्री जास्त त्यांच विकास कमी
गडकरी म्हणाले, ‘शोषीतांना आरक्षण मिळावे. परंतु, आरक्षण मिळालेल्यांचा विकास झाला नाही. सर्वाधिक प्रमाणात आरक्षण घेणाऱ्या समाजाचा विकास झाला असेही नाही. नरेंद्र मोदींनी कधीही मागास असल्याचे सांगितले नाही. जॉर्ज फर्नांडीस, इंदिरा गांधी यांनाही जात सांगावी लागली नसल्याचे ते म्हणाले. अधिक मंत्री असणाऱ्या समाजाचा विकास कमी होतो हा व्यावहारिक अनुभव आहे. मी देशभरात अनेक समाजांच्या कार्यक्रमाला जात असतो. त्या कार्यक्रमांमध्ये त्या त्या समजाला मंत्रिपद मिळायला पाहिजे, राजकारणात पुढे संधी मिळायला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत असते. पण, एखाद्या समाजाचा माणूस राजकारणात पुढे गेला तर तो त्याच समाजाचा विकास करेल, असे नाही. राजकारणात सगळ्यांचा विचार करून पुढे जावे लागते.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fortunate for no reservation for my caste minister nitin gadkari nagpur