आरटीआय कार्यकर्त्याला पाठवले वापरलेले कंडोम

वृत्तसंस्था
बुधवार, 16 जानेवारी 2019

जयपूर (राजस्थान): येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराखाली काही माहिती मागवली होती. त्यांना उत्तर म्हणून एक पत्रही आले. परंतु, त्यांनी ते पत्र उघडल्यानंतर धक्काच बसला. कारण त्या पाकिटामध्ये होते वापरलेले कंडोम.

विकास चौधरी व मनोहरलाल (रा. हनुमानगढ) यांनी माहिती अधिकाराखाली ग्रामपंचायतीकडे माहिती मागवली होती. परंतु, त्यांना वापरलेले कंडोम पाठविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दिल्लीमध्ये स्पर्धा परिक्षेची तयारी करत असलेले विकास चौधरी म्हणाले, 'आम्हाला दोन पत्र आली होती. एक पत्र उघडल्यानंतर एका जुन्या कागदामध्ये वापरलेले कंडोम आढळून आले. याबाबती माहिती विकास अधिकाऱयांना दिली. दुसऱे पत्र उघडणार होतो. परंतु, अधिकाऱयांनी ते न उघडण्याचा सल्ला दिला. यामुळे आम्ही गावातील ज्येष्ठ नागरिक व सीसीटीव्ही कॅमेऱयासमोर जाऊन दुसरे पत्र उघडले असता त्यामध्येही वापरलेले कंडमोच आढळून आले.'

सरकारी कामकाज अशा पद्धतीने चालते का? असा प्रश्न मनोहरलाल यांनी उपस्थित केला आहे. कोणीतरी जाणीवपूर्वक खोडसाळपणा केला आहे. याबद्दलची माहिती घेतली जाईल, असे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱयांनी सांगितले.

Web Title: Rajasthan Shocker RTI receive used condoms as reply