धक्कादायक! पाच महिन्यांपासून कोरोना पाठ सोडेना; 31 वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह

टीम ई सकाळ
Friday, 22 January 2021

पाच महिने झाले महिलेची तब्बल 31 वेळा कोरोना चाचणी झाली. तरीही कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्हच येत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.

भरतपुर - राजस्थानमध्ये एक धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे. भरतपूरच्या अपना घर आश्रमात राहणाऱ्या एक महिला गेल्या 5 महिन्यांपासून कोरोनाशी लढत आहे. पहिल्यांदा 4 सप्टेंबरला झालेल्या तपासणीमध्ये रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळला होता. तेव्हापासून आतापर्यंत ती कोरोनामुक्त झालेली नाही. गेल्या पाच महिन्यात महिलेच्या 31 तपासण्या झाल्या आणि ते सर्व रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या महिलेवर उपचार करणारे डॉक्टरही बुचकळ्यात पडले असून कोरोना संसर्ग कमी झालेला नाही. 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उपचार आणि चांगल्या तपासणीसाठी महिलेला आता भरतपूरमधून जयपूरला जाण्यास सांगितलं आहे.

हे वाचा - जुन्या 100 रुपयांच्या नोटा चलनातून होणार बाद? वाचा आरबीआयने काय म्हटलंय

अपना घर आश्रमचे संचालक डॉक्टर बीएम भारद्वाज यांच्या मते शारदा देवी यांच्या आई वडिलांचे निधन झाले होते. तर सासरच्या मंडळींनी घरातून काढून टाकलं होतं. तेव्हापासून संबंधित महिला अपना घर आश्रममध्ये राहत आहे. जेव्हा महिलेची कोरोना चाचणी केली त्याचा पहिला रिपोर्ट 4 सप्टेंबरला पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर पाच महिने झाले महिलेची तब्बल 31 वेळा कोरोना चाचणी झाली. तरीही कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्हच येत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. 

हे वाचा - यंदाचं बजेट 'पेपरलेस'; जाणून घ्या ब्रीफकेस पासून पेपरलेसपर्यंत झालेला 'बजेट'चा प्रवास

डॉक्टर बीएम भारद्वाज यांनी सांगितलं की, पाच महिन्यांपासून कोरोना पॉझिटिव्ह असा रिपोर्ट येत असून डॉक्टरांनीसुद्धा आश्चर्य व्यक्त केलं आहे. आता महिलेला जयपूरला पाठवण्याची तयारी केली जात आहे. ज्यामुळे तिला चांगले उपचार मिळू शकतील. या आजारामुळे महिलेचं वजनही वाढत असल्याचं ते म्हणाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajasthan women tested corona positive 31 time in last five months