चिमुकल्या माहीला बोअरवेलमधून वाचवलं, मात्र रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास...

मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात बोअरवेलमध्ये अडकलेल्या एका 5 वर्षाच्या निष्पाप मुलीला काल मंगळवार-बुधवार पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात यश आले
Five-year-old girl who fell into 25-ft borewell in Rajgarh rescued
Five-year-old girl who fell into 25-ft borewell in Rajgarh rescuedEsakal

मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात बोअरवेलमध्ये अडकलेल्या एका 5 वर्षाच्या निष्पाप मुलीला काल मंगळवार-बुधवार पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात यश आले. NDRF आणि SDRF च्या टीमने सुमारे 7 ते 8 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर बाहेर काढण्यात यश आले. त्यावेळी मुलीचा दम लागला होता. त्यानंतर तिला भोपाळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले, तिथे माहीचा मृत्यू झाला. बोडा पोलीस स्टेशन हद्दीतील पिपलिया रसोडा गावात ही घटना घडली आहे. मंगळवारी सायंकाळी ही मुलगी खेळत असताना बोअरवेलमध्ये पडली होती.(Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नरसिंहगड अंतर्गत पिपलिया रसोडा गावात मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आजोबांसोबत माही शेतात गेली. तिथे लहान मुलांसोबत खेळत असलेली ५ वर्षीय माही जुन्या बोअरवेलमध्ये पडली. याबाबतची माहिती स्थानिकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिली. वरील माहिती मिळताच राजगडचे एसडीआरएफ पथक घटनास्थळी पोहोचले आणि जेसीबी आणि इतर उपकरणे मागवून बचावकार्य सुरू केले. मुलीला ऑक्सिजन पुरवण्याबरोबरच कॅमेरे लावून तिच्या हालचालींवरही लक्ष ठेवले जात होते.

Five-year-old girl who fell into 25-ft borewell in Rajgarh rescued
मध्य प्रदेशातील पराभव जिव्हारी! कमलनाथ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

परिस्थितीचे गांभीर्य पाहून भोपाळ आणि गुना जिल्ह्यातील एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मुख्यमंत्री कार्यालयानेही राजगड प्रशासनाशी सतत संपर्क ठेवत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. काल रात्रीपर्यंत सुरू असलेल्या बचाव मोहिमेनंतर अखेर यश आले आणि माहीला बाहेर काढण्यात आले.

जिल्हा रुग्णालयाचे सीएमएचओ डॉ. किरण वाडिया यांनी सांगितले की, आम्ही मुलीला राजगड येथून थेट रुग्णालयात आणले, मात्र तिचा जीव वाचू शकला नाही.

Five-year-old girl who fell into 25-ft borewell in Rajgarh rescued
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कायदेमंत्रीपदाचा राजीनामा गहाळ; कोणत्याच यंत्रणेकडे मूळ प्रत नाही उपलब्ध!

मंगळवारी सायंकाळी 5 ते 5.30 च्या दरम्यान मैदानात खेळत असताना माही उघड्या बोअरवेलमध्ये पडली होती. या घटनेची माहिती मिळताच राजगडचे जिल्हाधिकारी हर्ष दीक्षित घटनास्थळी पोहोचले. यानंतर प्रशासकीय कर्मचारीही मुलीला बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर मुलीला सुखरूप बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं, ज्यावर स्वतः मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान लक्ष ठेवून होते.

दरम्यान, नवनियुक्त आमदार मोहन शर्मा संपूर्ण वेळ घटनास्थळी उपस्थित होते. घटनेनंतर तब्बल नऊ तास निष्पाप माही सुमारे तीस फूट खोल बोअरवेलच्या खड्ड्यात जीवन-मरणाची झुंज देत होती. या घटनेवर स्वत: मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी सतत लक्ष ठेवले. त्यांच्या आदेशावरूनच या बचावाची जबाबदारी एनडीआरएफकडे देण्यात आली होती.

त्याचवेळी माहीच्या कुटुंबियांची अवस्था कठीण झाली होती. दुसरीकडे लोक माही सुखरूप बाहेर यावी यासाठी प्रार्थना करत होते. मंदिर असो की मशीद, प्रत्येक व्यक्ती या मुलीच्या बचावासाठी प्रार्थना करत होती.

Five-year-old girl who fell into 25-ft borewell in Rajgarh rescued
Adani Group: शेअर बाजाराच्या तेजीत अदानी समूहाचा मोठा वाटा, गुंतवणूकदारांनी कमावले 1.9 लाख कोटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com