esakal | स्कायवॉक ब्रीज’वर चालण्याचा थरार लवकरच; बिहारमध्ये काचेचा पूल तयार
sakal

बोलून बातमी शोधा

bihar-skywalk

चीनमधील तैहांग येथील स्काय वॉकच्या धर्तीवर हा पूल बनविण्यात आला आहे. भविष्यात हा स्काय वॉक ब्रीज निसर्ग सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी निश्चितच आकर्षणाचे केंद्र राहणार आहे. 

स्कायवॉक ब्रीज’वर चालण्याचा थरार लवकरच; बिहारमध्ये काचेचा पूल तयार

sakal_logo
By
उज्ज्वल कुमार -सकाळ न्यूज नेटवर्क

पाटणा -  बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील राजगीरने राज्यातील पहिला व देशातील दुसरा काचेचा पूल (स्कायवॉक ब्रीज) बनविण्याचा मान पटकावला आहे. पाटण्यापासून ९२ कि.मी. अंतरावर असेल्या राजगीर या पर्यटन स्थळी स्कायवॉक ब्रीज पर्यटकांसाठी लवकरच खुला होईल.  इंजिनिअरिंगचा उत्कृष्ट नमुना असलेला आणि काच व स्टीलच्या फ्रेम्सपासून तयार करण्यात आलेला हा स्कायवॉक ब्रीज २५० फूट उंच, ९० फूट लांब व सहा फूट जाड आहे. त्यावर प्रत्येकी पंधरा मिमी जाड काचेचे तीन थर आहेत. काचांमुळे आरपार दिसणाऱ्या या पुलावरून एकाचवेळी ४० पर्यटकांना हवेत झुलण्यासारखा रोमांचक अनुभव घेता येईल. 

आणखी वाचा : रेल्वे सेवेबाबत अनिश्‍चितता कायम;प्रवासी वाहतूक नसल्याने उत्पन्न घटले 

राजगीर मध्ये ५०० एकरांवर निसर्ग सफारी बनविली जात असून स्कायवॉक ब्रीज त्याचाच एक भाग आहे. त्याच्या शेवटच्या टोकावर बारा जण उभे राहू शकणार आहेत.  पुलावरून चालताना पर्यटकांना हवेत झुलण्याबरोबरच आणखी रोमांचकारी अनुभवासाठी लवकरच विद्युतीकरण करण्यात येणार आहे. चीनमधील तैहांग येथील स्काय वॉकच्या धर्तीवर हा पूल बनविण्यात आला आहे. देशातील पहिला स्कायब्रीज सिक्किममधील पोलिंगमध्ये आहे. भविष्यात हा स्काय वॉक ब्रीज निसर्ग सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी निश्चितच आकर्षणाचे केंद्र राहणार आहे. 

आणखी वाचा : कोरोनाची लस कधी आणि कोठे मिळणार? आरोग्य मंत्रालयानं दिली उत्तरे

loading image