#MeToo ला माझा पाठिंबा : रजनीकांत

वृत्तसंस्था
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

चेन्नई : महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना #MeToo या मोहिमेंतर्गत समोर येत आहेत. त्यानंतर आता #MeToo या मोहिमेला दाक्षिणात्य सुपरस्टार आणि राजकारणात नुकतेच पदार्पण केलेले रजनीकांत यांनी पाठिंबा दिला आहे. याबाबत त्यांनी सांगितले, की ''#MeToo या मोहिमेला माझा पाठिंबा आहे. मात्र, याचा गैरवापर होऊ नये''.

लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरलेल्या महिलांकडून मागील काही दिवसांपासून #MeToo मोहिमेंतर्गत उघडपणे बोलले जात आहे. या मोहिमेंतर्गत बॉलिवूडसह विविध क्षेत्रातील महिला पुढे येत आहेत. चेन्नई विमानतळावर पोचल्यानंतर त्यांना पत्रकारांनी याबाबत विचारले असता ते म्हणाले,  #MeToo एक चांगली चळवळ आहे. मात्र, महिलांनी त्याचा गैरवापर करू नये. #MeToo चा योग्य वापर व्हायला हवा.

Web Title: Rajinikanth Supports MeToo Movement