'एक भारत, एक निवडणूक'ला रजनीकांत यांचा पाठिंबा

वृत्तसंस्था
रविवार, 15 जुलै 2018

''केंद्राच्या 'एक भारत, एक निवडणूक' प्रस्तावाला आपला पाठिंबा आहे. ही एक चांगली बाब आहे. त्यामुळे राजकीय पक्षांचा वेळ आणि पैसा वाचेल''.

- रजनीकांत, दाक्षिणात्य सुपरस्टार

चेन्नई : केंद्र सरकारच्या 'एक भारत, एक निवडणूक'च्या प्रस्तावाला तमिळनाडू राज्यातून विरोध केला जात आहे. मात्र, दाक्षिणात्य सुपरस्टार आणि राजकारणात नव्याने पदार्पण केलेल्या रजनीकांत यांनी केंद्र सरकारच्या या प्रस्तावाला आज (रविवार) पाठिंबा दर्शवला आहे. 

चेन्नई येथे पत्रकारांशी बोलताना रजनीकांत यांनी यावर भाष्य केले. 'एक भारत, एक निवडणूक' या केंद्र सरकारच्या प्रस्तावाला तमिळनाडू राज्यातील विविध पक्षांनी विरोध केला आहे. मात्र, रजनीकांत यांनी याला पाठिंबा देत सांगितले, की ''केंद्राच्या 'एक भारत, एक निवडणूक' प्रस्तावाला आपला पाठिंबा आहे. ही एक चांगली बाब आहे. त्यामुळे राजकीय पक्षांचा वेळ आणि पैसा वाचेल''. दरम्यान, रजनीकांत यांना आगामी विधानसभा निवडणूक लढवणार का, याबाबत विचारले असता ते म्हणाले, याबाबतचा निर्णय नंतर घेऊ. तसेच चेन्नई-सालेम या आठ लेन एक्स्प्रेस वेबाबत त्यांनी सांगितले, की असे प्रकल्प औद्योगिक गुंतवणूक आणतील.  

Web Title: Rajinikanth Supports One India One Election Proposal