राजीव कुमार हे देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त; १५ मे रोजी स्वीकारतील पदभार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajiv Kumar is the next Chief Election Commissioner of the country

राजीव कुमार हे देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त; १५ मे रोजी स्वीकारतील पदभार

देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार (Rajiv Kumar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत राजीव कुमार १५ मे पासून मुख्य निवडणूक आयोग आयुक्त (Chief Election Commissioner) म्हणून पदभार स्वीकारणार आहे. केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी राजीव कुमार यांची नियुक्ती जाहीर केली. (Rajiv Kumar is the next Chief Election Commissioner of the country)

विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त (CEO) सुशील चंद्रा यांची जागा राजीव कुमार घेतील. सुशील कुमार (Rajiv Kumar) यांनी गेल्या पाच विधानसभा निवडणुकांसह अनेक निवडणुका घेतल्या होत्या. सुशील चंद्रा यांचा कार्यकाळ १४ मे रोजी संपणार आहे. राजीव कुमार यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९६० रोजी झाला. ते बिहार-झारखंड केडरचे १९८४ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे एक अधिकारी आहे. त्यांनी ३६ वर्षे प्रशासकीय सेवेत काम केले आहे.

हेही वाचा: रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे पंतप्रधान!; आतापर्यंत चारवेळा PM

फेब्रुवारी २०२० मध्ये ते सेवानिवृत्त झाले. १ सप्टेंबर २०२० रोजी ते भारतीय निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त म्हणून रुजू झाले होते. ते सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाचे अध्यक्ष राहिले आहेत. राजीव कुमार यांनी भारत सरकारच्या वित्तीय सेवेत वित्त सचिव सह सचिव तसेच भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), नाबार्डच्या केंद्रीय संचालक मंडळाचे निदेशक म्हणून काम केले आहे.

राजीव कुमार (Rajiv Kumar) हे इकॉनॉमिक इंटेलिजन्स कौन्सिलचे सदस्य, फायनान्शिअल स्टेबिलिटी ॲण्ड डेव्हलपमेंट कौन्सिलचे सदस्य तसेच बँक्स बोर्ड ब्यूरोचे सदस्य आहेत. शिवाय वित्तीय क्षेत्र नियामक नियुक्ती शोध समिती अशा अनेक मंडळांवर आणि समित्यांवर काम केले आहे. राजीव कुमार यांनी B.Sc, LLB, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट, सार्वजनिक धोरण आणि टिकाऊपणामध्ये (Public Policy and Sustainability) पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.

Web Title: Rajiv Kumar Is The Next Chief Election Commissioner Of The Country Assuming Office On 15th May

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top