राजनाथ सिंह तमिळवासियांना म्हणाले, मला माफ करा!

 rajnath singh,tamil language, tamil nadu, BJP, Development
rajnath singh,tamil language, tamil nadu, BJP, Development

कोरोना विषाणूच्या संकटानंतर (Covid 19 Pandemic) भारत विकासाची नवी कहाणी लिहित आहे, असे वक्तव्य देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी केले. तमिळनाडूमधील सलेम येथील भारतीय जनता युवा मोर्चाच्या सम्मेलनात (BJYM) ते बोलत होते. कोरोनाच्या संकटातून आपण सावरत आहोत. दिवसागणिक परदेशी गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे शेअर बाजारामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचेही दिसते, असेही त्यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनी तमिळमध्ये बोलण्याची इच्छा होती. पण ही भाषा बोलण्यासाठी मी सक्षम नाही, त्याबद्दल माफी मागतो, असेही ते कार्यक्रमात उपस्थितीत असलेल्यांना उद्देशून म्हणाले. तमिळ एक सुंदर भाषा आहे. 

कोरोना संकटावर भाष्य करताना राजनाथ सिंह म्हणाले की, आपण केवळ कोरोनावर नियंत्रण मिळवलेले नाही. तर 'मेक इन इंडिया' लस तयार करण्यातही यश मिळवले. याचा वापर केवळ देशात नाही तर परदेशातही होणार आहे. इतर देशांची आपण मदत करत आहोत, या गोष्टींवरही त्यांनी भर दिला. कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. अर्थव्यवस्थेला पूर्ववत रुळावर आणण्यासाठी सरकारने शक्यतोपरी प्रयत्न केले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) भारतीय अर्थव्यवस्थेसाठी शुभ संकेत दिल्याचे उदाहरणही त्यांनी यावेळी दिले. 2021-22 मध्ये भारताचा GDP 11% होईल, असा अंदार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तवल्याचे त्यांनी सांगितले.   

यावेळी राजनाथ सिंह यांनी केद्र सरकारने ग्रामविकासासाठी आणलेल्या योजनांचा पाढाही वाचून दाखवला. ग्रामिण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकार पक्के रस्ते बांधणीला गती देण्याचे काम करत आहे. त्यामुळे ग्रामिण विकासालाही गती येईल. किसान सम्मान निधीच्या माध्यामातून शेतकऱ्यांना प्रत्येकवर्षी  6,000 रुपये सरकरा देणार आहे. शहरी विकाससाठी 100 लाख कोटींचा खर्च करण्याची तयारी सरकारने दाखवली आहे, हे देखील त्यांनी सांगितले. सेलम- चेन्नई एक्सप्रेसवे बांधणीसंदर्भातील बोलणी 2021-22 मध्ये सुरु होईल, असेही ते आपल्या भाषणामध्ये म्हणाले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com