esakal | कोळसा तस्करी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई; अभिषेक बॅनर्जी यांच्या थेट घरात पोहोचली टीम
sakal

बोलून बातमी शोधा

CBI, Mamta Banerjee, Abhishek Banerjee, coal smuggling case summon

पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी अभिषेक बॅनर्जी भाजपच्या निशाण्यावर असल्याचे दिसते.

कोळसा तस्करी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई; अभिषेक बॅनर्जी यांच्या थेट घरात पोहोचली टीम

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

पश्चिम बंगालमधील कोळसा तस्करी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई केली. सीबीआयची एक टीम रविवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या घरी पोहचली. प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, अभिषेक बॅनर्जी यांची पत्नी रजिरा बॅनर्जी यांना समन्स देण्यासाठी CBI ची टीम अभिषेक बॅनर्जी यांची घरी पोहचली. कोळसा तस्करी प्रकरणातील चौकशीसाठी त्यांना नोटीस बजावण्यात आल्याचे समजते.  

कोळसा घोटाळा प्रकरणात अभिषेक बॅनर्जी यांच्या नातेवाईकांच्या विरोधात छापेमारी देखील यापूर्वी करण्यात आली होती. 31 डिसेंबर 2020 रोजी कोलकातामधील तृणमूल काँग्रेस युवा संघटनेचे सचिव विनय मिश्रा यांच्याविरोधात पशु तस्करी प्रकरणात चौकशी करण्यात आली होती. याप्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने लुक आउट सर्कुलर  (LOC) जारी केले होते.  

पेट्रोल-डिझेलच्या 'शंभरी'वर सीतारमण म्हणाल्या, 'माझं उत्तर तुम्हाला पटणार नाही'

पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी अभिषेक बॅनर्जी भाजपच्या निशाण्यावर असल्याचे पाहायला मिळते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अनेक रॅलीमध्ये अभिषेक बॅनर्जी यांचे नाव घेत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. याप्रकरणात अभिषेक बॅनर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांवर मानहानीचा गुन्हा देखील दाखल केला आहे.  

काय आहे नेमकं प्रकरण

कोळसा खाणीतून कोट्यवधी किंमतीच्या कोळशाचा काळाबाजार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका रॅकेटच्या माध्यमातून पश्चिम बंगालच्या पश्चिम भागात अवैधरित्या कोळ्या बाजारात कोळसा विक्री झाल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणात अभिषेक बॅनर्जींचा हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.    

16 तास चाललेल्या चर्चेत भारताने चीनला सुनावलं; 'पूर्व लडाखमधील इतर...

याप्रकरणात सीबीआयने विनय मिश्रा यांच्या घरावर छापेमारी केल्यानंतर टीएमसीचे माजी नेता शुभेंदु अधिकारीने अभिषेक बनर्जी यांच्यावर निशाणा साधला होता. सक्षम भाचा नेतृत्व करत असलेल्या सदस्यांचे खरे रुप बाहेर येत आहे, असा टोला त्यांनी ट्विटच्या माध्यमातून लगावला होता. टीएमसीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन त्यांनी खास टीम तयार केली आहे, असा उल्लेखही या ट्विटमध्ये करण्यात आला होता. याप्रकरणातील मुख्य संशयीत  अनूप माझी उर्फ लाला फरार असून सीबीआयने त्यांच्या विरोधात लुक आउट नोटीस जारी केले आहे.