राजनाथसिंह यांच्यावर राष्ट्रपती निवडणूकीच्या ‘संवादा‘ची जबाबदारी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदाची मुदत २४ जुलैला संपत असल्याने नव्या राष्ट्रपतींच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
Rajnath Singh
Rajnath SinghSakal
Summary

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदाची मुदत २४ जुलैला संपत असल्याने नव्या राष्ट्रपतींच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

नवी दिल्ली - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधकांची एकजूट करण्याचे प्रयत्न वेगवान केलेले असताना सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने मित्रपक्षांशी संवादाचा सेतू बांधण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथसिंह व पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मनातील' संभाव्य भाजप उमेदवारांची नावे विरोधी पक्षनेत्यांना सांगून चाचपणी करणे व त्यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी राजनाथसिंह यांच्यावर देण्यात आली आहे. राष्ट्रपतीपदासाठी एकाद्या महिला नेत्याचे नाव भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाकडून समोर आणले जाईल अशी चिन्हे आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदाची मुदत २४ जुलैला संपत असल्याने नव्या राष्ट्रपतींच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचबरोबर राजकीय हालचालीही गतिमान झाल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत विरोधी नेत्यांची बैठक बोलावली आहे. मात्र, कॉंग्रेस व माकप या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता धूसर आहे. ममता यांच्या बैठकीला जाणे म्हणजे विरोधकांच्या राष्ट्रव्यापी आघाडीसाठी त्यांचे नेतृत्व मान्य करणे आहे. अशा प्रकारचे प्रयत्न याआधीच सुरू करणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनाही ममता बॅनर्जींकडे विरोधकांच्या नेतृत्वाचे सुकाणू जाऊ देणे मान्य होणार नाही.

या पार्श्वभूमीवर भाजपकडूनही हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. राष्ट्पती व उपराष्ट्रपतीपदसाठीही भाजप उमेदवाराची निवड पंतप्रधान मोदी हे स्वतः करणार आहेत. त्यात पंतप्रधानांच्या प्रसिध्द ‘धक्कातंत्राचा‘ वापर होणार हेही दिसत आहे. त्यामुळे अंदाज बांधणे, या पलिकडे प्रसार माध्यमांच्या हाती काही नाही. तरीही काही नावे चर्चेत आणली गेली आहेत. राष्ट्रपतीपदासाठी छत्तीसगडच्या राज्यपाल अनूसुया उईके, ज्येष्ठ नेत्या द्रौपदी मुर्मू, लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या नावांची तर उपराष्ट्रपतीपदासाठी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी,विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केरळचे राज्यपाल अरिफ महमंद खान, महाजन आदींची नावे भाजपने चर्चेत आणली आहेत.

राजनाथसिंह, नड्डा यांच्यावर भाजप मित्रपक्षांच्या नेत्यांशी चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रपतीपदासाठी सर्वानुमते एकच उमेदवार देण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केले असून एनडीएतील सर्व घटक पक्ष, युपीएतील सर्व पक्ष तसेच इतर पक्ष आणि अपक्षांशी चर्चा करण्याची जबाबदारी दोघांवर टाकण्यात आली आहे. त्यादृष्टीने ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी व विरोधी नेते चंद्राबाबू नायडू, अण्णाद्रमुक नेते पनीर सेल्वम व इतर आदींबरोबर राजनाथसिंह व नड्डा आगामी काळात चर्चा करतील. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ जून असल्याने भाजप त्याच्या फार तर एक दिवस आधी आपला उमेदवार जाहीर करू शकतो. १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी व नंतर काही काळातच उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. २१ जून रोजी देशाला नवे राष्ट्रपती मिळतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com