कुठल्याही भारतीयांवर अन्याय होणार नाही- राजनाथ सिंह

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

एनआरसी मुद्यावरून सध्या विरोधी पक्ष आणि सत्ताधारी भाजपामध्ये जोरात वादविवाद सुरू आहेत. या वादविवादांना शांत करण्यासाठी आज (ता.03) केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हा काही अंतिम निर्णय नाही आणि हा शेवटचा ड्राफ्टही नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, कुठल्याही भारतीयांवर अन्याय होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली- एनआरसी मुद्यावरून सध्या विरोधी पक्ष आणि सत्ताधारी भाजपामध्ये जोरात वादविवाद सुरू आहेत. या वादविवादांना शांत करण्यासाठी आज (ता.03) केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हा काही अंतिम निर्णय नाही आणि हा शेवटचा ड्राफ्टही नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, कुठल्याही भारतीयांवर अन्याय होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

त्याचबरोर, एनआरसी हे देशाच्या सुरक्षिततेसाठी गरजेचे आहे. कुठल्याही देशाची जनसंख्या किती आहे हे जाणून घेणे ही त्या देशाची वास्तविक जिम्मेदारी असल्याचे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. दिवंगत राजीव गांधी जेव्हा देशाचे पंतप्रधान होते, त्यावर्षी म्हणजेच 1985 साली एनआरसीची प्रक्रियेला सुरवात झाली होती आणि ती अपडेट करण्याचा निर्णय 2005 साली मनमोहन सिंग पंतप्रधान असताना घेण्यात आला. 

राजनाथ सिंह म्हणाले की, एनआरसी पूर्ण प्रक्रिया ही सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली करण्यात आली आहे. त्याचबरोबर, हा काही फायनल ड्राफ्ट नाही, एनआरसीमध्ये पूर्ण निष्पक्ष चौकशी होईल. कुठल्याही भारतीय नागरिकांवर अन्याय होणार नाही. एनआरसीच्या मुद्यावरून विरोधकांनी आरोप करणे हे अत्यंत चुकीचे आहे.

Web Title: Rajnath singh on NRCAssam in rajyasabha