
Rajnath Singh Statement: पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबून दहशतवाद्यांना धडा शिकवला. पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. यात जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबाच्या मुख्यालयांनाही टार्गेट करण्यात आलं.
ऑपरेशन सिंदूरनंतर आज दिल्लीत संसदेत सर्व पक्षीय बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीला सर्व पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. सर्वपक्षीय बैठकीत राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय.