जुगारासाठी रजनीकांतकडे इतके पैसे कोठून आले

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 जुलै 2017

नवी दिल्ली - भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आज सुपरस्टार रजनीकांत यांचे छायाचित्र ट्‌विटरवर टाकून त्यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. या छायाचित्रामध्ये रजनीकांत एका कॅसिनोमध्ये जुगार खेळत असल्याचे दिसत असून, त्यांच्याकडे जुगार खेळायला पैसा कोठून आला, असा सवाल स्वामी यांनी उपस्थित केला आहे.

रजनीकांत सध्या उपचारानिमित्त अमेरिकेत गेले असून, त्यांचे कॅसिनोमधील छायाचित्र स्वामी यांनी ट्‌विटरवर टाकले आहे. ''420 रजनीकांत हे आपली प्रकृती सुधारण्यासाठी अमेरिकेतील कॅसिनोत जुगार खेळत आहेत, त्यांच्याकडे एवढा पैसा कोठून आला, याचा तपास सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) करावा,'' असे स्वामी यांनी आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, रजनीकांत यांनी राजकारणात येण्याचे संकेत यापूर्वी दिले आहेत. यावरून स्वामींनी रजनीकांत यांना लक्ष्य केले होते. कलाकारांच्या राजकारणात येण्याने तमिळनाडूचे फार मोठे नुकसान झाल्याची टीका स्वामी यांनी केली होती. रजनीकांत हे अडाणी असून, ते राजकारणासाठी अनफिट असल्याचे स्वामी यांनी म्हटले होते.

रुग्णालयाचे बिल चेकने देणार का?
सुब्रमण्यम स्वामी यांच्या ट्‌विटवरून एका चाहत्याने प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर, रजनीकांत यांच्याकडे इतका पैसा आहे, तर त्यांनी इथे भारतात उपचार घ्यायचे होते. तेथील उपचाराचा खर्च ते चेकने अदा करणार का, असा प्रतिपश्‍न स्वामी यांनी विचारला. तुम्हीही हॉर्वर्ड विद्यापीठात गेला होता, या दुसऱ्या एका चाहत्याचा प्रश्‍नावर स्वामी यांनी "मी तेथे स्कॉलरशिपवर गेलो होते. मात्र ही बाब रजनीकांत यांचे चाहते मान्य करणार नाहीत, कारण बहुतांशी ते अडाणी आहेत.' असे उत्तर स्वामी यांनी दिले.

Web Title: rajnikant news marathi news sakal news