

Srinagar Stray Dog Issue
esakal
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांनी घातलेल्या धुमाकुळामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यांपासून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कोटरंका परिसरातील सुमारे दोन डझन शाळा बंद ठेवण्यात आल्या. तसेच भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी पोलिसांसह केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) जवान, कार्यकारी दंडाधिकारी आणि ग्राम संरक्षण दलाच्या (व्हीडीजी) सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.