Ashok Gehlot : राजस्थानातही शिंदे पॅटर्न! 92 काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची हाक

sachin pilot ashok gehlot
sachin pilot ashok gehlotSakal

जयपूर : राजस्थानचे नवे मुख्यमंत्री होण्यास सचिन पायलट यांच्या नावाला गेहलोत समर्थक असलेल्या जवळपास ९२ आमदारांनी विरोध दर्शवत आपला राजीनामा देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आता राजस्थान काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. तर आपले मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी अशोक गेहलोत शिंदे पॅटर्न वापरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

(Rajsthan Congress Politics Latest Updates)

दरम्यान, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी मोर्चेबांधणी केली असून येत्या १७ ऑक्टोबर रोजी ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे त्यांना आपले मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या नावाची चर्चा होती पण गेहलोत यांनी आपले मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी नवी खेळी खेळली असल्याची चर्चा आहे.

sachin pilot ashok gehlot
'ब्राह्मणाने 2017 मध्ये मराठ्यांची झोळी भरली'; तानाजी सावंतांचे वादग्रस्त विधान

अशोक गेहलोत यांना समर्थन असणाऱ्या तब्बल 92 आमदारांनी पायलट यांच्या नावाला विरोध दर्शवला असून विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा देण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे राजस्थानमधील काँग्रेसचा खेळ बिघडला आहे. अशोक गेहलोत यांनी महाराष्ट्रासारखाच शिंदे पॅटर्न वापरला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

'एक व्यक्ती एक पद' या काँग्रेसच्या योजनेनुसार गेहलोत यांना काँग्रेसचे अध्यक्ष व्हायचे असेल तर राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार आहे पण त्यांना दोन्ही पद आपल्या हातात हवे आहेत. त्यामुळे हा सगळा राजकीय वाद सुरू झाला आहे. तर ९२ आमदारांच्या राजीनाम्याचे शस्त्र पुढे करत त्यांनी खेळलेली खेळी यशस्वी होणार का याकडे लक्ष लागले आहे.

sachin pilot ashok gehlot
Boat Accident : बांगलादेशमध्ये नदीत बोट उलटून 24 जणांचा मृत्यू

राजस्थानच्या आमदारांनी का केलंय बंड?

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत पण काँग्रेसच्या एक पद एक व्यक्ती या धोरणामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल. पण त्यांना दोन्ही पदं आपल्याकडे हवे आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या समर्थक आमदारांना घेऊन ही खेळी खेळली आहे. हे आमदार आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवणार असून राजस्थान काँग्रेसमध्ये पुढे काय होणार याकडे लक्ष लागलेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com