esakal | दिल्लीनंतर 'या' ठिकाणी भाजपचा मार्ग खडतर!
sakal

बोलून बातमी शोधा

rajya sabha 55 seats going to be vacant bjp will not get majority in house

महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात काँग्रेसचे संख्याबळ मोजकेच आहे. हीच परिस्थिती शेजारच्या गुजरातमध्येही आहे.

दिल्लीनंतर 'या' ठिकाणी भाजपचा मार्ग खडतर!

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेच्या 55 जागा पुढील महिन्यात रिक्त होत आहेत. अलिकडच्या काळातील विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांना मिळालेले यश पाहता या सभागृहात बहुमताची जुळवाजुळव करणं सत्ताधारी भाजपला जड जाणार असल्याचे चित्र आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

गेल्या दोन वर्षांत विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या सत्तेला लागलेली ओहोटी आणि प्रादेशिक पक्षांनी मारलेली मुसंडी पाहता एप्रिलमध्ये होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये या प्रादेशिक पक्षांचा वरचष्मा असेल. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड या राज्यांमध्ये भाजपला पराभव पत्करावा लागला. नाही म्हणायला हिमाचल प्रदेश आणि आसाम ही राज्ये हाती आहेत. मात्र बडी राज्ये गमावल्याने राज्यसभेतील संख्याबळ स्थिर ठेवण्याची डोकेदुखी भाजपपुढे आहे. कॉंग्रेसचीही वाट चांगलीच खडतर आहे.

आणखी वाचा - मल्ल्याळी भाषेच्या परीक्षेत बिहारी महिला प्रथम!

महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात काँग्रेसचे संख्याबळ मोजकेच आहे. हीच परिस्थिती शेजारच्या गुजरातमध्येही आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगण विधानसभेमध्येही काँग्रेसचे फारसे प्रतिनिधित्व नाही. या प्रमुख पक्षांच्या तुलनेमध्ये दक्षिणेत वायएसआर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, एआयएडीएमके, द्रमुक या पक्षांना राज्यसभेवर प्रतिनिधी पाठविण्याची संधी अधिक आहे. पश्चिाम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला चार जागा जिंकण्याची खात्री वाटते आहे. तामिळनाडूमध्ये दोन्ही प्रमुख प्रादेशिक पक्षांना प्रत्येकी तीन जागा जिंकण्याची अपेक्षा आहे. 

आणखी वाचा - जमियाँ प्रकरणातील सर्वांत धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

कोणत्या राज्यात किती जागा?

 • महाराष्ट्र - 7 
 • तामिळनाडू - 6 
 • पश्चिम बंगाल - 5 
 • बिहार - 5 
 • आंध्र प्रदेश - 4 
 • गुजरात - 4  
 • मध्य प्रदेश - 3
 • ओडिशा - 4
 • राजस्थान - 3 
 • छत्तीसगड - 2
 • झारखंड - 2 
 • तेलंगण - 2 
 • हरियाना - 2
 • हिमाचल प्रदेश - 1 
 • मणिपूर - 1 
 • मेघालय - 1  
 • आसाम - 3