राज्यसभेसाठी भाजप नेत्यांच्या चर्चांवर चर्चा

राष्ट्रपतीपदासाठीही मोर्चेबांधणी
Rajya Sabha BJP Submission candidate application starts from today
Rajya Sabha BJP Submission candidate application starts from todaysakal

नवी दिल्ली : राज्यसभेच्या १५ राज्यांतील ५७ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरवात झाली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आजपाध्यक्ष जे पी नड्डा व वरिष्ठ पक्षनेत्यांशी दीर्घ चर्चा करून पक्षाच्या संभाव्य नावांबद्दल खलबते केली. राज्यसभेतील सर्वाधिक ११ जागांसाठी निवडणूक होणार असून या निवडणुकीचा थेट परिणाम आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर होणार आहे. त्यामुळे भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने राज्यसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे निर्देश दिले आहेत त्यानुसार शहा व नड्डा यांनी मोर्चेबांधणीला सुरवात कली आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील ६ पैकी २ जागा भाजप हमखास जिंकणार आहे. मात्र तिसऱया जागेसाठीही पक्षाने सक्रिय प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेना- छत्रपती संभाजीराजे यांच्यातील ताणाताणीत भाजप ही जागा पदरात पाडून घेण्यासाठी ‘धक्कातंत्र' वापरू शकते अशी दिल्लीत चर्चा आहे. सहाव्या जागेसाठी संभाजीराजे अपक्ष म्हणून उभे राहिलेच तर वेळप्रसंगी त्यांना पाठिंबा द्यावा काय, याबाबतही पक्षात खल सुरू असून भाजपचे राज्यातील नेतृत्व म्हणजे विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यबाबतचा ‘अंतिम' निर्णय घेतील असे पक्षसूत्रांनी स्पष्ट केले. राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याची ३१ मे ही अंतिम मुदत आहे. १० जून रोजी राज्यसभेसाठी मतदान होईल व त्याच दिवशी मतमोजणीही होईल.

राज्यसभेतील ज्या दिग्गजांचा कार्यकाळ आता संपणार आहे त्यात सभागृहनेते पियूष गोयल, केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, कॉग्रेस नेते जयराम रमेश, कपिल सिब्बल व अंबिका सोनी तसेच बसपाचे सतीश मिश्रा यांचा समावेश आहे. राज्यसभेच्या २४५ पैकी भाजपकडे सध्या ९५ खासदार आहेत तरी पक्षाचे येथे स्पष्ट बहुमत अजूनही नाही. वरिष्ठ सभागृहात उत्तर प्रदेशचे सर्वाधिक ३४ खासदार असून त्यातील ११ जणांचा कार्यकाळ संपत आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र-तमिळनाडूतील प्रत्येकी ६ सदस्य निवृत्त होत आहेत. तमिळनाडूतून भाजपला काही आशा नाही. एकूण चित्र पहाता या निवडणुकीनंतर भाजपची राज्यसभेतील सदस्य संख्या कमी होण्याची चिन्हे आहेत.

कर्नाटकात येदियुरप्पांना दे धक्का !

कर्नाटक विधान परिषदेच्या ५ जागांसाठी भाजपने ज उमेदवार जाहीर केले. मात्र माजी मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा यांचे पुत्र बी वाय विजयेंद्र यांचाच पत्ता भाजपने कट केला आहे. भाजप नेतृत्वाने येदियुरप्पा यांना हा जोरदार धक्का दिला आहे.कर्नाटकात ३ जून रोजी विधान परिषद निवडणूक होत आहे. भाजपच्या यादीत माजी उपमुख्यमंत्री लक्ष्ण सवदी, राज्य सरचिटणीस हेमलता नायक, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष चलवादी नारायणस्वामी, बलवराज होलाट्टी आणि एस.केशवप्रसाद यांचा समावेश आहे. भाजपच्या राज्य सुकाणू समितीने विजयेंद्र यांच्या नावाची शिफारस केली होती तीही ‘दिल्लीश्वरांनी‘ फेटाळली हे अत्यंत सूचक मानले जाते.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २५ जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे बाजपने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठीच्या ‘इलेक्ट्रोरल कॉलेज' चे वर्तमान स्वरूप पाहिले तर भाजप आघाडीकडे ४८.९ टक्के हक्काची मते आहेत. कॉंग्रेस व विरोधी पक्षांकडे साधारणतः ५१.१ टक्के मते आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर राव यांनी विरोधकांच्या एकीसाठी कंबर कसली असून विविध विरोधी पक्षीय मुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशीही ते लवकरच चर्चा करणार आहेत. भाजपच्या मर्जीविरूध्द राज्यात जातीनिहाय जनगणनेची घोषणा करण्याचे धक्कातंत्र नितीश यांनी नुकतेच वापरले तरी राष्ट्रपतीपदासारख्या मोठ्या निवडणुकीत नितीशकुमार भाजपची साथ सोडतील असे राजकीय निरीक्षकांना वाटत नाही. नितीशकुमार केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांना पुन्हा संधी देणार नाहीत कारण ते दिल्लीत भाजपच्या ‘फारच जवळ' गेले आहेत, अशीही माहिती मिळत आहे. भाजपने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नितीशकुमार यांच्याशी चर्चा करण्यास पाटण्यात पाठविले होते. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यामार्फत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या संपर्कात भाजप नेतृत्व आहे. आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी सतत संपर्क साधण्यासाठी एका भाजप नेत्याला सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com