गोंधळ घालणाऱ्या खासदारांमध्ये आत्मशुद्धीचा भाव जागा होईल; उपसभापती करणार एक दिवसाचा उपवास

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

निलंबनाची कारवाई झालेल्या खासदारांनी संसदेच्या आवारातच ठिय्या मांडला. मंगळवारी सकाळी खुद्द उपसभापती हरिवंश त्यांच्यासाठी चहा घेऊन गेले मात्र खासदारांनी तो घेण्यास नकार दिला. हरिवंश यांच्या या कृतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं.

नवी दिल्ली - राज्यसभेत कृषी विधेयकाच्या मंजुरीवेळ झालेल्या गोंधळात खासदारांनी केलेल्या गैरवर्तनामुळे दु:खी झालेले उपसभापती हरिवंश एक दिवसाचा उपवास करणार आहेत. रविवारी कृषी विधेयकावरून विरोधकांनी राज्यसभेत अभूतपूर्व असा गोंधळ केला. या गोंधळात खासदारांनी नियमावली पुस्तिका फाडली, उपसभापतींचा माईक तोडला. त्यानंतर सभापती व्यंकय्या नायडू यांनी 8 खासदारांवर निलंबनाची कारवाई केली. 

हरिवंश यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहलं आहे. त्यात म्हटलं की, 20 सप्टेंबरला जे काही झालं त्यामुळे मला खूप वाईट वाटलं. गेल्या दोन दिवसांपासून मानसिक त्रास होत आहे. रात्रभर झोपही लागली नाही. भगवान बुद्ध माझ्या जीवनाची प्रेरणा आहेत. बिहारच्या भूमीत आत्मज्ञानाचा शोध लागलेल्या बुध्दांनी आत्मदीपो भव: असं म्हटलं होतं. मला वाटतं की संसदेत माझ्याशी ज्या पद्धतीने खासदार वागले त्यामुळे मला एक दिवसाचा उपवास करायला हवा. माझ्या या कृतीने सदस्यांमध्ये आत्मशुद्धीचा भाव जागा होईल असी आशा आहे. 

हरिवंश यांनी खासदारांना चहा दिला या कृतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. मोदींनी ट्विटरवरून म्हटलं की, यातून हरिवंश यांची महानता दिसून येते. लोकशाहीसाठी यापेक्षा सुंदर असा संदेश असू शकत नाही. यासाठी त्यांचे खूप अभिनंदन.

दरम्यान, निलंबनाच्या कारवाईचा निषेध कऱण्यासाठी राज्यसभेचे आठही खासदार संसदेच्या आवारातच धरणे आंदोलनासाठी बसले आहेत. रात्रभर ते आंदोलनासाठी बसले होते. त्यांच्यासाठी उपसभापती हरिवंश हे चहासुद्धा घेऊन गेले होते. मात्र खासदरांना पाहुणचारासाठी बसलो नाही. घरी आलात तर स्वागत सध्या आम्ही शेतकऱ्यांसाठी बसलो आहे असं उत्तर देत चहा घेण्यास नकार दिला. 

हे वाचा - उपसभापती हरिवंश यांची निलंबित खासदारांसोबत 'चाय पे चर्चा' ; पाहा VIDEO

देशभरातून कृषी विधेयकाला विरोध होत असताना राज्यसभेत रविवारी ते मांडण्यात आलं. तेव्हा बहुमत नसेलल्या एनडीएविरोधात विरोधक आक्रमक झाले. या गोंधळातच आवाजी मतदानाने विधेयक मंजुर केलं गेलं. राज्यसभेत झालेल्या गोंधळावेळी खासदारांकडून उपसभापतींच्या समोर असलेली नियमपुस्तिकासुद्धा फाडली. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी केली होती. गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर सभापती व्यंकय्या नायडू यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajya Sabha Deputy Chairman Harivansh to observe one day fast