कपील सिब्बल यांची पुन्हा राज्यसभेवर वर्णी? सपा किंवा ZMM देणार पाठिंबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajya Sabha Election 2022 kapil sibal rajya sabha re-entry with support of jmm or samajwadi party

कपील सिब्बल यांची पुन्हा राज्यसभेवर? सपा किंवा ZMM देणार पाठिंबा

नवी दिल्ली : काँग्रेस नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांचा राज्यसभा सदस्य म्हणून कार्यकाळ संपला आहे, त्यामुळे आता त्यांना अनुक्रमे झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) किंवा समाजवादी पक्षाच्या (SP) पाठिंब्याने झारखंड किंवा यूपीमधून संसदेच्या वरच्या सभागृहात पुन्हा निवडून येऊ शकतात. (Rajya Sabha Election 2022)

कपील सिब्बल हे 2016 मध्ये, ते तत्कालीन सत्ताधारी समाजवादी पक्षाने समर्थित काँग्रेसचे उमेदवार म्हणून यूपीमधून राज्यसभेवर निवडून आले होते, परंतु आता राज्य विधानसभेत काँग्रेसचे फक्त 2 आमदार आहेत त्यामुळे ते कोणालाही निवडून देण्याच्या स्थितीत नाहीत.

यूपीमध्ये, जेथे 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे, तेथे भाजप सात आणि समाजवादी पक्ष तीन जागा जिंकू शकतो - आणि यानंतर अजूनही त्यांच्याकडे 20 अतिरिक्त मते असतील. तथापि, भाजपने आठवा उमेदवार उभा केल्यास 11व्या जागेसाठी अडचण निर्माण होईल, ज्यामुळे निवडणूक घ्यावी लागेल. आणि इथेच जास्तीची मते महत्त्वाची ठरतील. मात्र, सत्ताधारी भाजपला 10 पेक्षा कमी मतांची गरज असल्याने त्याचा फायदा आहे, परंतु विरोधकांकडे 15 मतांची कमतरता आहे.

झारखंडमध्ये, काँग्रेस-समर्थित उमेदवाराची स्थिती चांगली आहे कारण पक्ष सत्ताधारी आघाडीत आहे आणि एक जागा जिंकू शकतो. काँग्रेसने गेल्या वेळी ही जागा जेएमएमला दिली होती आणि यावेळी काँग्रेस त्या जागेवर स्वतःसाठी दावा करत आहे. सिब्बल हे विविध उच्च न्यायालये आणि आणि सर्वोच्च न्यायालयात ZMM आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांच्या न्यायालयीन खटल्यांमध्ये कायदेशीररित्या गुंतलेले आहेत, त्यामुळे पक्ष त्यांच्या उमेदवारीसाठी अनुकूल असतील असा अंदाज वर्तविला जात आहे, तर निकटवर्तीयांचे म्हणणे आहे की ते काँग्रेसच्या अधिकृत यादीची वाट पाहत आहेत.

काँग्रेस राजस्थान, कर्नाटक, हरियाणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधून आठ राज्यसभा सदस्य निवडूण देऊ शकते आणि तामिळनाडू आणि झारखंडमधील मित्रपक्षांच्या पाठिंब्याने आणखी दोन जागा येऊ शकतात.

सिब्बल, आनंद शर्मा आणि पी. चिदंबरम यांना संधी मिळण्याची शक्यता असून शर्मा यांना हरियाणातून निवडून येण्याची आशा आहे, परंतु सूत्रांनी सांगितले की कुमारी सेलजा आणि रणदीप सिंग सुरजेवाला हे देखील दावेदार आहेत. चिदंबरम यांना त्यांच्या गृहराज्य तामिळनाडूमधून नामांकन मिळू शकते.

हेही वाचा: प्रियंका गांधी कर्नाटकातून राज्यसभा निवडणूक लढवणार? काय म्हणाले डीके शिवकुमार..

सिब्बल, आनंद शर्मा आणि पी. चिदंबरम यांना संधी मिळण्याची शक्यता अशून. शर्मा यांना हरियाणातून निवडून येण्याची आशा आहे, परंतु सूत्रांनी सांगितले की कुमारी सेलजा आणि रणदीप सिंग सुरजेवाला हे देखील दावेदार आहेत. चिदंबरम यांना त्यांच्या गृहराज्य तामिळनाडूमधून नामांकन मिळू शकते.

हेही वाचा: Jio-Airtel-Vi चे प्रीपेड प्लॅन पुन्हा महागणार; होणार 10-12 टक्के वाढ

Web Title: Rajya Sabha Election 2022 Kapil Sibal Rajya Sabha Re Entry With Support Of Jmm Or Samajwadi Party

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top