Rajya Sabha NominationSakal
देश
Rajya Sabha Nomination : निकम, श्रृंगला यांची राज्यसभेवर नियुक्ती; राष्ट्रपतींकडून मीनाक्षी जैन, सदानंदन यांनाही खासदारकीची संधी
Ujjwal Nikam : गाजलेल्या २६/११ हल्ला खटल्यातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर नियुक्ती केली.
नवी दिल्ली : अनेक गाजलेल्या खटल्यांमध्ये सरकारची बाजू प्रभावीपणे मांडलेले वरिष्ठ वकील उज्जवल निकम यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यानंतर जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी अजमल कसाब याला फासावर लटकविण्यात निकम यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. राष्ट्रपतींनी माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, इतिहासकार मीनाक्षी जैन आणि शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन यांचीही राज्यसभेवर नियुक्ती केली आहे.