झारखंडच्या पराभवाचे प्रतिबिंब राज्यसभेतही दिसणार

Jharkhand-Rajyasabha-Calculation
Jharkhand-Rajyasabha-Calculation

नवी दिल्ली - महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडमधील सत्ताही भाजपला गमवावी लागली आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम राज्यसभेतही पडणार असून भाजपला त्याची किंमत मोजावी लागेल, अशी चर्चा आहे.

मोदी सरकार २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीला सामोरे जाईल, त्या वेळी झारखंडमधून राज्यसभेवर भाजपचा एकही प्रतिनिधी नसण्याची शक्‍यता आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात लढलेल्या झारखंड विकास मोर्चाची साथ मिळाली तरच, भाजपला राज्यसभेमध्ये सध्याची सदस्य संख्या कायम ठेवता येईल. झारखंडमध्ये राज्यसभेच्या एकूण सहा जागा आहेत. त्यातल्या तीन भाजपकडे, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाकडे (राजद) प्रत्येकी एक जागा आहे. सहावी जागा अपक्ष खासदार व उद्योजक परीमल नाथवानी यांच्याकडे आहे.

झारखंडमधील राज्यसभेच्या प्रत्येकी दोन जागांसाठी २०२०, २०२२ आणि २०२४ या वर्षांत निवडणूक होणार आहे. एकूण सहा जागांसाठी नवनियुक्त सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राजद विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे. विधानसभेतील नवे बदलेले संख्याबळ लक्षात ही लढत अधिक चुरशीची होईल. मतांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजपला छोट्या पक्षांवर अवलंबून राहावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com