राकेश टिकैत पुन्हा शेतकरी आंदोलन छेडणार; मोदी सरकारला दिला थेट इशारा

Rakesh Tikait
Rakesh Tikaitesakal
Summary

'सरकारनं गेल्या वर्षी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं अद्याप पूर्ण केलेली नाहीयत.'

मुझफ्फरनगर : भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी केंद्र सरकारला (Central Government) पुन्हा एकदा आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिलाय. राकेश टिकैत म्हणाले, निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा सरकारला विसर पडलाय. टिकैत यांनी शेतकऱ्यांना आंदोलनासाठी सज्ज राहण्यास सांगितलंय. टिकैत यांचं म्हणणं की, सरकारनं गेल्या वर्षी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं अद्याप पूर्ण केलेली नाहीयत. त्यामुळं पुन्हा आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आंदोलनाची तारीख अद्याप ठरलेली नाहीय. मात्र, तयारी पूर्ण झाली असल्याचं टिकैत यांनी सांगितलं.

Rakesh Tikait
'विक्रांत'प्रकरणी आम्ही दमडीचाही घोटाळा केला नाही : किरीट सोमय्या

मुझफ्फरनगरमध्ये बोलताना टिकैत पुढं म्हणाले, मोदी सरकारनं (Modi Government) तीन कृषी कायदे (Agricultural laws) मागे घेण्याशिवाय आणखी अनेक आश्वासनं दिली. किमान आधारभूत किंमत हमी कायदा, रास्त दरात वीज, सिंचन यांसारखी आश्वासनं देण्यात आली होती. मात्र, आजपर्यंत एकही आश्वासन पूर्ण झालं नाही. त्यामुळं पुन्हा आंदोलन करण्याची भूमिका घेतलीय. या आंदोलनाची तारीख अद्याप ठरलेली नाही. परंतु, आंदोलनाची तयारी पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं.

Rakesh Tikait
'काश्मीर हिंसाचाराचा मी साक्षीदार, भाजपवर आरोप करणं चुकीचं'

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly Election) सरकारला शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडलाय. आश्वासनांची पूर्तता लवकर न झाल्यास शेतकरी आंदोलनासाठी सज्ज असल्याचा इशारा त्यांनी केंद्र सरकारला दिलाय. तर, दुसरीकडं किसान युनियनचे अध्यक्ष राजवीर सिंह जादौन यांनीही शेतकऱ्यांना संघटित होण्याचं आवाहन करत पुन्हा एकदा दीर्घ संघर्ष करावा लागणार असल्याचं सांगितलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com