काश्मीर हिंसाचाराचा मी साक्षीदार, भाजपवर आरोप करणं चुकीचं : मुरली मनोहर जोशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murli Manohar Joshi

आता लोक भाजपवर चित्रपटाच्या माध्यमातून अपप्रचार करत असल्याचा आरोप करत आहेत.

'काश्मीर हिंसाचाराचा मी साक्षीदार, भाजपवर आरोप करणं चुकीचं'

भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी (Murli Manohar Joshi) यांनी 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) या चित्रपटातून अपप्रचार केला जात असल्याचा आरोप फेटाळून लावलाय. जोशी म्हणाले, देशात असे अनेक राजकीय पक्ष आहेत, जे आता विरोधात आहेत. त्यांनी 1990 मध्ये काश्मिरी पंडितांवर (Kashmiri Pandit) झालेल्या अत्याचाराविरोधात कधीही आवाज उठवला नाहीय, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलंय.

जोशी पुढं म्हणाले, 'काश्मीरात हिंसाचार झाला तेव्हा मी प्रत्यक्षदर्शी तिथं होतो. मध्य प्रदेशचे नेते केदारनाथ साहनी आणि आरिफ बेग यांच्यासोबत मी काश्मीरला गेलो होतो. आम्ही काश्मीरमधील परिस्थितीचा अहवाल तयार करून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना सादर केला होता. दरम्यान, आमच्या टीमनं काश्मीरमधील हिंसाचार पीडितांची भेट घेतली आणि सरकारकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप केला.'

हेही वाचा: पंजाब जिंकणाऱ्या 'आप'ला मोठा धक्का; 150 नेत्यांनी केला भाजपात प्रवेश

सरकार आरोपींना मोकळीक दिल्याचं पाहून आम्हालाही आश्चर्य वाटलं. त्यावेळी काश्मीरात भीषण स्थिती निर्माण झाली होती. आता लोक भाजपवर चित्रपटाच्या माध्यमातून अपप्रचार करत असल्याचा आरोप करत आहेत. मात्र, ते साफ चुकीचं आहे. लोक आजही अशा ऐतिहासिक घटनांबाबत अनभिज्ञ आहेत. सोहराबजींच्या काळात झालेला नरसंहार लोकांसमोर का मांडला जात नाही, हिटलरनं जं केलं तेही लोकांना दाखवलं जात नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

हेही वाचा: 'विक्रांत'प्रकरणी आम्ही दमडीचाही घोटाळा केला नाही : किरीट सोमय्या

'द काश्मीर फाईल्स'मुळं सत्य जगासमोर आलं : नितीन गडकरी

द काश्मीर फाईल्स चित्रपटानं काश्मीर खोऱ्यातील खरा इतिहास जगासमोर आणलाय. त्यामुळंच या सिनेमाला दीर्घकाळ लक्षात ठेवलं जाईल, असं केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हंटलंय. इंडिया इंटरनॅशनल सेंटरमधील आयोजित कार्यक्रमात बोलताना गडकरींनी चित्रपटाचं आणि कलाकारांचं कौतुक केलंय.

Web Title: Bjp Leader Murli Manohar Joshi Accusing Bjp Spreading Propaganda The Kashmir Files Bam92

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..