Raksha Bandhan: बहिणीला काय गिफ्ट देताय? सलमानने अर्पिताला १५० एकरचं फार्महाऊस दिलेलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raksha Bandhan 2022

Raksha Bandhan: बहिणीला काय गिफ्ट देताय? सलमानने अर्पिताला १५० एकरचं फार्महाऊस दिलेलं

बॉलिवूडचा दबंग खान म्हणून ओळख असलेला अभिनेता सलमान खान त्याच्या चित्रपटांमुळे नेहमी चर्चेत असतो. पण तेवढाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येत असतो. मग त्याचे लव अफेअर्स असो की त्याच्या कुटूंबातील व्यक्तींमुळे.

सध्या काही दिवसांवर रक्षाबंधन सण आहे. सलमान खान सुद्धा त्याच्या दोन बहिणी अलवीरा आणि अर्पिता सोबत रक्षाबंधन साजरा करतो. सलमान अनेक वेळा त्याच्या या दोन बहिणीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. विशेष म्हणजे सलमान आणि त्याची लहान बहिण अर्पिता यांचे नाते खुप खास आहे पण तुम्हाला माहिती आहे का? सलमान आणि अर्पिताचे रक्ताचे नाते नाही. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल सलमानच्या आयुष्यात अर्पिताची एंट्री कशी झाली? चला तर जाणून घेऊया.

हेही वाचा: Raksha Bandhan 2022: बहिणीने चुकूनही भावाला बांधू नये अशी राखी, नाहीतर...

सलमानचे वडिल सलिम खान हे दररोज मर्निंग वॉकला जायचे. एकदा असंच मर्निंग वॉकला जाताना त्यांचे लक्ष एका महिलेकडे आणि एका लहान मुलगीकडे गेले.

ती महिला भिक मागत होती. सलिम खान यांना त्या महिलेची मदत करायची होती मात्र काही दिवसानंतर त्या रस्त्यावरील महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे त्या महिलेसोबत राहणारी लहान मुलगी रस्त्यावर रडत उभी होती. त्यावेळी त्या मुलीला सलिम खान यांनी दत्तक घेतलं. ती लहान मुलगी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून अर्पिता खान आहे. सलमान बहिण अर्पिताला त्याची लकी चार्म मानतो.

हेही वाचा: Raksha Bandhan: धनंजय मुंडेच्या हातावर पहिली राखी पंकजा मुंडे बांधायच्या

सलमान खान आणि अर्पिता यांचे नाते अनोखे आहे. सलमान अर्पिताच्या खुप जवळ आहे. तो तिच्याशी प्रत्येक गोष्टी शेअर करतो. तिच्या आनंदासाठी तो नेहमी प्रयत्न करतो.

अर्पिताने तिच्यापेक्षा एक वर्षाने लहान बॉयफ्रेंड आयुषसोबत लग्न केले. सलमान खानने आपली बहिण अर्पिता खानच्या लग्नात तिला आपला पनवेलमधील 150 एकरमध्ये पसरलेलं फॉर्म हाऊस गिफ्ट केला होता. अर्पिताला दिलेला हा फ्लॅट बांद्र्यातील कार्टर रोडवर आहे. जो सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटपासून अगदी जवळ आहे. सलमानने हा फ्लॅट 16 कोटी रूपयांना खरेदी केला होता.

Web Title: Raksha Bandhan Special Actor Salman Khan And Arpita Khan Sharma Brother Sister Or Sibling Bonding

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top