
Raksha Bandhan: धनंजय मुंडेच्या हातावर पहिली राखी पंकजा मुंडे बांधायच्या
सध्या रक्षाबंधन हा सण काही दिवसांवर आहे. हा दिवस भाऊ बहिणीच्या नात्याची पुजा करणारा दिवस आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केलातर बहिणा भावाच्या अनेक जोडींनी राजकारणाक अधिराज्य गाजवले आहे. यात सातत्याने चर्चेत आलेली बहीणभावाची जोडीची म्हणजे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे.
हेही वाचा: Fadnavis and Munde Meet रात्री उशिरा झालेल्या मुंडे - फडणवीस भेटीमुळे नव्या चर्चांना उधाण
एक काळ होता, जेव्हा या बहिणभावाच्या नात्यांविषयी सगळीकडे प्रशंसा व्हायची. पण आज मात्र परिस्थिती बदलली. २०१२ ला धनंजय मुंडे यांनी भाजपला रामराम ठोकत जेव्हा राष्ट्रवादीची वाट धरली. हा पंकजा मुंडे सह संपुर्ण मुंडे कुटूंबासाठी खूप मोठा धक्का होता. धनंजय मुंडेनी राजकारणात जसा मार्ग बदलला तसे त्यांचे बहिण पंकजा मुंडे सोबतचे संबंधही कालांतराने बदलले.
हेही वाचा: Video : Pankaja Munde यांचा विधानपरिषदेचा पत्ता पुन्हा कट
रक्षाबंधनबाबत बोलताना धनंजय मुंडेनी एका मुलाखतीत पंकजा यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला होता. धनंजय मुंडे म्हणतात, "आम्ही वेगळे होण्याअगोदर माझ्या आयुष्यात रक्षाबंधनाच्या दिवशी पहिली राखी मला पंकजाताईनी बांधली आहे आणि भाऊबीजेची पहिली ओवाळणी सुद्धा पंकजाताईनीच केली आहे. मी माझ्या सख्ख्या बहीणींकडून कधी राखी बांधून घेतल्याचे त्यावेळी मला आठवत नाही. परंतु पंकजाताईंकडून प्रत्येक वर्षी राखी बांधत होतो. माझ्या घरातून तसं सांगितलं जात होतं की आधी पंकजा, प्रीतम आणि नंतर माझ्या सख्ख्या बहीणी…आमच्या नात्यात राजकारणामुळे दुरावा निर्माण झाला असली तरी नात्यात संवाद असावा अशीच माझी कायम भूमिका राहिली आहे.
"निवडणुका ऐकमेकांच्या विरोधात लढवू देत. परंतु घरातील सुख, दुःखात आपण एकत्र असायला हवं. मी एकत्र येण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण मला त्यात यश आलं नाही. घर म्हणून जो संवाद असायला हवा तो आता आमच्यात नाही" असेही ते पुढे म्हणाले.
हेही वाचा: Dhananjay Munde: सहनशीलता संपली आणि तक्रार दिली
यामुळे धनंजय मुंडे यांनी भाजपला रामराम ठोकला..
मंडळी गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसदार म्हणून पंकजा मुंडे यांना महत्व दिल्याकारणाने धनंजय मुंडे यांची साफ नाराजी झाली होती. आणि याच कारणावरून त्यांनी अखेर २०१२ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना स्वतःच्या बहिणीकडून म्हणजेच पंकजा मुंडेंकडून पराभव स्विकारावा लागला होता. पण धनंजय मुंडे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बाजी मारली आणि पंकजा मुंडे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.
Web Title: Raksha Bandhan Bjp Leader Pankaja Munde And Ncp Leader Dhananjay Munde Siblings Bonding In Rakhi Purnima Festival
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..