Ram Mandir : पंतप्रधानांचा आदेश डावलून या व्यक्तीने सूत्र हालवली नसती तर राम मंदिर कधीच उभे राहीले नसते

राम मंदिरासाठी या व्यक्तीने पंतप्रधानांचा आदेशही फाट्यावर मारला होता
Ram Mandir
Ram Mandir esakal
Updated on

Ram Mandir :

अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला प्रभू श्री रामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे. या अभिषेक सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः अयोध्येला पोहोचणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अनेक कार्यक्रमात सहभागी होत आहेत.

अशा प्रसंगी एका व्यक्तीला विसरून चालणार नाही. ज्याच्यामुळे अयोध्येत श्री रामांचे मंदिर साकारत आहे. कोण होती ती व्यक्ती ज्यांनी तत्कालिन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा आदेश डावलून श्री रामांची मूर्ती बाबारी मशिदीत ठेवली हे आज आपण जाणून घेऊयात.

ही व्यक्ती आहे फैजाबाद जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी के.के.नायर यांच्याबद्दल. ज्यांची त्यावेळची ओळख ही हिंदुत्ववादी अधिकारी अशी बनली होती. कारण, तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आदेश दिल्यानंतरही के.के.नायर यांनी श्री रामांची मूर्ती बाबरी मशिदीतून हटवली नाही.

Ram Mandir
Ram Mandir Pran Pratishta: रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची वेळ ठरली, २४ पद्धतींनी होणार पूजा.. जाणून घ्या सविस्तर

त्यामुळे हिंदु लोकांसाठी ते मोठे नेते बनले होते. पुढे त्याला याचा मोठा फायदा झाला. पुढे त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने लोकसभा निवडणूकच लढवली नाही तर जिंकलीही. एवढेच नाही तर त्यांच्या प्रतिमेचा फायदा त्यांच्या चालकालाही मिळाला. त्यांच्या ड्रायव्हरने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकून आमदार झाला.  

नायर हे 1930 च्या बॅचचे आयसीएस अधिकारी होते

22 आणि 23 डिसेंबर 1949 च्या मध्यरात्री बाबरी मशिदीत श्री रामांच्या मूर्ती गुप्तपणे ठेवण्यात आल्या होत्या. यानंतर अयोध्येत गोंधळ सुरू झाला की, श्री राम जन्मभूमीत अयोध्येत प्रकट झाले आहेत. लिबरहान आयोगाच्या अहवालानुसार घटनास्थळी तैनात कॉन्स्टेबल माता प्रसाद यांनी पोलीस स्टेशन प्रभारी राम दुबे यांना घटनेची माहिती दिली.

माता प्रसाद यांनी त्यावेळी माध्यमांना असे सांगितले होते की, 50 ते 60 जणांनी परिसराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी तेथे श्रीरामाची मूर्ती स्थापन केली. तसेच भिंतींवर जय श्री राम हे पिवळ्या आणि भगव्या रंगात लिहिलेले होते.

Ram Mandir
Ram Mandir Pran Pratishta: अखेर रामलल्ला पोहोचले आपल्या नव्या घरी; मंदिराच्या गर्भगृहात आगमन

लेखक हेमंत शर्मा यांनी त्यांच्या 'युद्ध में अयोध्या' या पुस्तकात लिहिले आहे की, केरळमधील अलेप्पी येथील रहिवासी केके नायर हे 1930 च्या बॅचचे आयसीएस अधिकारी होते. फैजाबादचे जिल्हाधिकारी असताना त्यांच्या कार्यकाळात बाबरीत श्री रामांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या.

हेमंत शर्मा पुस्तकात लिहितात की नायर हे बाबरी प्रकरणाशी संबंधित आधुनिक भारतातील व्यक्ती आहेत. ज्यांच्या कार्यकाळात या प्रकरणात सर्वात मोठे वळण आले. देशाच्या सामाजिक-राजकीय जडणघडणीवर याचा मोठा परिणाम झाला. केके नायर 1 जून 1949 रोजी फैजाबादचे जिल्हाधिकारी बनले. 23 डिसेंबर 1949 रोजी जेव्हा मशिदीमध्ये प्रभू रामाच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या, तेव्हा नेहरूंनी तत्कालीन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री गोविंद बल्लभ पंत यांना तात्काळ मूर्ती हटवण्यास सांगितले.

Ram Mandir
Ayodhya Ram Mandir: अखेर राम लल्ला घरात आले! चार तासानंतर गर्भगृहात विराजमान

उत्तर प्रदेश सरकारने मूर्ती हटवण्याचे आदेश दिले, परंतु जिल्हाधिकारी के.के. नायर यांनी दंगलीच्या भीतीने आणि हिंदूंच्या भावना भडकावल्यामुळे या आदेशाची अंमलबजावणी करण्यास असमर्थता व्यक्त केली.

जेव्हा नायर खासदार झाले तेव्हा त्यांचा ड्रायव्हर आमदार झाला 

पुस्तकातील माहितीनुसार, तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी पुतळे हटवण्यास सांगितले तेव्हा नायर यांनी सरकारला पत्र लिहिले की, मूर्ती हटवण्यापूर्वी मला माझ्या पदावरून हटवा. देशातील जातीय वातावरण लक्षात घेऊन सरकारने पाऊल मागे घेतले. डीएम नायर यांनी 1952 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी देशाच्या चौथ्या लोकसभेसाठी उत्तर प्रदेशातील बहराइचमधून जनसंघाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली.

Ram Mandir
Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत UP ATSची मोठी कारवाई! तीन संशयितांना घेतलं ताब्यात

त्यांच्या पत्नी शकुंतला नायर याही जनसंघाच्या तिकिटावर कैसरगंजमधून तीनदा लोकसभेत पोहोचल्या. पुढे त्यांचा ड्रायव्हरही उत्तर प्रदेश विधानसभेचा सदस्य झाला. वादग्रस्त जागेवरून पुतळे न हटवल्याचा मुस्लिमांनी निषेध केला. दोन्ही पक्षांनी न्यायालयात खटला दाखल केला. त्यानंतर सरकारने ही जागा वादग्रस्त घोषित करून टाळे ठोकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com