Sambhaji Nagar News : संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घटना : शेतकऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात
sambhaji nagar
sambhaji nagar sakal

छत्रपती संभाजीनगर : शेतात जाण्याचा रस्ता बंद केल्याने न्याय मिळत नसल्याने एका शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी (ता. १७) अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.

नर्मदाबाई पुंजाराम औताडे व शंकर पुंजाराम औताडे (रा. आगाठाण, ता. गंगापूर) चिंचखेडा शिवारात गट नं. ७६ मध्ये शेतजमीन आहे. मात्र, संदीप मोकळे नामक व्यक्तीने शेतजमिनीचा रस्ता बंद केला आहे.

हा रस्ता मोकळा करून देण्याच्या मागणीसाठी औताडे हे पाठपुरावा करत आहेत. तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदने दिले आहेत. असे असताना प्रत्यक्षात कारवाई केली जात नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com