

Ayodhya Ram Temple security upgrade:
sakal
अयोध्येतील भव्य राम मंदिरासह राज्यातील अतिमहत्त्वाच्या आणि संवेदनशील आस्थापनांची सुरक्षा आणखी मजबूत करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने अत्याधुनिक शस्त्रास्त्रे आणि सुरक्षा उपकरणांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. पोलीस आधुनिकीकरण योजनेअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला असून, राम मंदिराच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक स्नायपर रायफल्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
शासनाने प्रत्येकी रु. १०.७६ लाख किमतीच्या तीन अत्याधुनिक स्नायपर रायफल्स खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. याशिवाय सुरक्षा तपासणीसाठी १४ टेलिस्कोप सर्च मिरर्स खरेदी केले जाणार आहेत.
ही शस्त्रे आणि सुरक्षा उपकरणे उत्तर प्रदेश विशेष सुरक्षा दलाकडे (UP SSF) देण्यात येणार आहेत. अयोध्येतील श्री राम मंदिरासह रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम (RRTS), लखनौमधील लोक भवन, मेट्रो रेल्वे प्रकल्प आणि अलाहाबाद उच्च न्यायालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेसाठी त्यांचा वापर केला जाणार आहे.