PM Modi Explains Ideal Governance on Vijayadashami
esakal
समाजात फूट पाडणारे आणि देशाच्या संस्कृतीचा द्वेष करणारे लोक हे देशाचे शत्रू आहेत, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयादशमीच्या निमित्ताने देशवासीयांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. ‘मां भारतीच्या शत्रूंना ओळखून त्यांचा पराभव करायला हवा. राष्ट्र प्रथम हा संकल्प घेऊन सर्वांनी एकत्र यायला हवं,’ असं ते म्हणाले. दिल्लीतील आयपी एक्स्टेंशन येथे आयोजित रावण दहन कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं.