esakal | 'अयोध्येत पाय ठेवून देणार नाही'; महंतांची उद्धव ठाकरेंना धमकी!
sakal

बोलून बातमी शोधा

CM-Uddhav-Thackeray

गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेने अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा अजेंड्यावर ठेवला होता.

'अयोध्येत पाय ठेवून देणार नाही'; महंतांची उद्धव ठाकरेंना धमकी!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

अयोध्या : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे शनिवारी (ता.७) अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा ठरणार आहे. मात्र, हा दौरा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मुख्यमंत्री ठाकरे अयोध्येत येणार असल्याचे कळाल्यानंतर अयोध्येतील साधु-संत मंडळींनी त्यांना विरोध करण्यास सुरवात केली आहे. हनुमान गढीचे महंत राजू दास यांनी ठाकरेंचा अयोध्या दौरा हाणून पाडण्याचे ठरविले आहे. ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, असा धमकीवजा इशाराही त्यांनी ट्विटरवरून दिला आहे. 

- ShaheenBagh: शाहीन बाग परिसरात जमाब बंदी आदेश; आंदोलन मोडून काढणार?

महंत राजू दास यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, उद्धव ठाकरेंनी मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्याचा विचार केला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना भरकटली आहे. त्यामुळे ठाकरेंना आम्ही अयोध्येत येऊ देणार नाही. 

येत्या शनिवारी (ता.७) महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने मुख्यमंत्री ठाकरे अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. तसेच सायंकाळी शरयू नदीची आरतीही करणार आहेत. या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक मंत्री, खासदार, आमदारमंडळी, नेते-कार्यकर्तेही असणार आहेत, अशी माहिती पक्ष प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दिली. 

- खुशखबर! गॅस सिलेंडरच्या दरात कपात; नवे दर...

गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेने अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा अजेंड्यावर ठेवला होता. या द्वारे तत्कालिन मित्रपक्ष भाजपची चांगलीच गोची केली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त राम जन्मभूमीवर तोडगा काढत अंतिम निकाल दिला. 

- Video : आता 'जेम्स बाँड'ही बोलू लागला मराठी; पाहा भन्नाट ट्रेलर!

त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. मात्र, तेव्हापासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेची कोंडी होत असून भाजपही सेनेला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाही.