लोकसभा निवडणुकांपूर्वी राममंदिराच्या बांधकामाला सुरवात- अमित शहा

वृत्तसंस्था
शनिवार, 14 जुलै 2018

2019 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला सुरवात करण्यात येईल असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे.  राम मंदिर-बाबरी प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यातच, शहा यांनी हे वक्तव्य केल्याने गोंधळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधक भाजपावर निशाणा साधण्याची शक्यता आहे.

हैद्राबाद- 2019 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला सुरवात करण्यात येईल असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे. राम मंदिर बाबरी प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यातच, शहा यांनी हे वक्तव्य केल्याने गोंधळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधक भाजपावर निशाणा साधण्याची शक्यता आहे.

भाजपातील नेत्यांसोबत अमित शाह यांची बैठक शुक्रवारी हैदराबादमध्ये झाली. त्यादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे. निवडणुका जाहीर होण्याआधीच राम मंदिर निर्मितीच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलली जातील असे त्यांनी स्पष्ट केल्याचे भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य पी शेखरन यांनी सांगितले. 

दरम्यान, अमित शहा यांच्या वक्तव्याचा वृत्तसंस्थेकडून विपर्यास करण्यात आला असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. अमित शहा यांनी राममंदिराबाबत कुठल्याही प्रकारचे वक्तव्य केले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

विरोधकांनी अनेकवेळा राममंदिर मुद्द्यावरून भाजपावर निशणा साधला आहे. भाजप फक्त मतांसाठी मंदिर निर्मितीच्या गोष्टी करतात अशी टीका विरोधकांनी अनेकवेळा केली आहे.

Web Title: Ram Temple Construction In Ayodhya To Begin Before 2019 Elections says Amit Shah