चार महिन्यांत अयोध्येत भव्य राम मंदिर उभारू : अमित शहा

वृत्तसंस्था
Monday, 16 December 2019

सर्वोच्च न्यायायाने अयोध्या प्रकरणी निकाल दिलेला आहे. शंभर वर्षांपासून जगभरातील भारतीयांची मागणी होती, की राम जन्मभूमीवर भव्य राम मंदिर बांधले जावे.

रांची : अयोध्येत येत्या चार महिन्यांत भव्य आणि गगनचुंबी राम मंदिर उभारले जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

झारखंड विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान अमित शहा यांनी राम मंदिराबाबत वक्तव्य केले आहे. पाकुरमध्ये सुरु असलेल्या सभेत बोलताना शहा म्हणाले, की सर्वोच्च न्यायायाने अयोध्या प्रकरणी निकाल दिलेला आहे. शंभर वर्षांपासून जगभरातील भारतीयांची मागणी होती, की राम जन्मभूमीवर भव्य राम मंदिर बांधले जावे. पण हे काँग्रेस नेते आणि वकील कपिल सिब्बल कोर्टात म्हणायचे की आता खटला चालवू नका, भाऊ, तुमच्या पोटात का दुखत आहे? पण, आता निर्णय झाला आहे, येत्या चार महिन्यांच्या आत अयोध्येत प्रभू श्रीराम यांचे मंदिर बनत आहे.

जामीया इस्लामिया विद्यापीठाबाहेर जाळपोळ, बस पेटवल्या; 'कॅब' विरोधाला हिंसक वळण

अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबरला ऐतिहासिक निर्णय दिला होता. अयोध्येतील ती 2.5 एकर वादग्रस्त जमीन ही रामलल्ला समितीला देण्यात आली होती. तर, सुन्नी वक्फ बोर्डाला 5 एकर जमीन अयोध्येत मोक्याच्या ठिकाणी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ram Temple will be constructed in next 4 months, says Amit Shah