‘रामायण’ मालिकेने घडविला इतिहास

पीटीआय
Sunday, 3 May 2020

सुमारे तीन दशकांनंतर रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेने पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. जगात सर्वाधिक पाहिला जाणारा कार्यक्रम म्हणून रामायण मालिकेची नोंद झाली आहे. दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित झालेल्या १६ एप्रिल रोजीचा रामायण मालिकेतील भाग हा ७.७ कोटी दर्शकांनी पाहिला. त्यामुळे जगातील सर्वाधिक दर्शक लाभणारा कार्यक्रम म्हणून रामायण मालिकेवर जागतिक विक्रम नोंदला गेला आहे.

नवी दिल्ली - सुमारे तीन दशकांनंतर रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेने पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. जगात सर्वाधिक पाहिला जाणारा कार्यक्रम म्हणून रामायण मालिकेची नोंद झाली आहे. दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित झालेल्या १६ एप्रिल रोजीचा रामायण मालिकेतील भाग हा ७.७ कोटी दर्शकांनी पाहिला. त्यामुळे जगातील सर्वाधिक दर्शक लाभणारा कार्यक्रम म्हणून रामायण मालिकेवर जागतिक विक्रम नोंदला गेला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनामुळे देशभरातील नागरिक सध्या आपल्या घरात बंदिस्त आहेत. लॉकडाउनमुळे चित्रपटांचे, मालिकांचे आणि वेब सिरिजचे शूटिंग बंद असल्याने दूरचित्रवाणीवरून एकही नव्या मालिकेचे प्रसारण झालेले नाही. याशिवाय रामायण मालिकेचे दूरदर्शनवरून पुन्हा प्रसारण करावे, अशी मागणी बऱ्याच काळापासून केली जात होती. त्यामुळे केंद्र सरकारने लॉकडाउनच्या काळात रामायण मालिकेचे पुन्हा प्रसारण करण्याचा निर्णय घेतला. याबरोबरच महाभारत, आर्य चाणक्य, ब्योमकेश बक्षी यासारख्या लोकप्रिय मालिकांचेही पुन:प्रसारण सुरू केले. पौराणिक मालिकांना दर्शकांनी चांगलीच पसंती दिली असून उत्तर रामायण मालिकेसही चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

लॉकडाऊन 3.0 विषयी सर्वकाही सांगणारी बातमी; वाचा सविस्तर

मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला तेव्हा १ कोटी ७० लाख नागरिकांनी रामायण पाहिल्याची नोंद झाली. १६ एप्रिलचा भाग ७.७ कोटी दर्शकांनी पाहिला आहे. ही संख्या जगभरातील अन्य मालिकेला लाभलेल्या दर्शकांपेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आले. प्रेस इन्फॉरमेशन ब्यूरो (पीआयबी) ने ट्‌विट करत म्हटले, की ‘रामायण’ला सर्वाधिक रेटिंग मिळाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramayan Serial History