रामदास आठवलेंना सरंसंघचालकांचे म्हणणे 'अमान्य'

वृत्तसेवा
शुक्रवार, 27 डिसेंबर 2019

नवी दिल्ली - रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख आणि केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचे हिंदू संदर्भातील वक्तव्य अमान्य असल्याचे सांगितले आहे. मोहन भागवत यांनी काल (ता.२६) म्हटले होते की, देशातील 130 कोटी लोकांना धर्म आणि संस्कृतीच्या पुढे जाऊन आम्ही हिंदूच मानतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मोहन भागवत यांच्या या वक्तव्यावर आठवले यांनी भागवत यांचे हे वक्तव्य अमान्य असल्याचे म्हटले आहे. आठवले म्हणाले, 'सर्व भारतीय हिंदू आहे, हे म्हणणे उचित नाही. एका काळी आपल्या देशात सर्व बौद्ध होते. जर भागवतांना देशातील सर्व लोक भारतीय म्हणयाचं असेल तर ठिक आहे. देशात बौद्ध, शिख, हिंदू, मुस्लीम, पारसी, जैन आणि लिंगायत पंथाचे लोक राहतात'.

चंपा आता कावळा, जित्या आणि चोरही - अजित पवार

मोहन भागवत यांनी हैदराबाद येथे आयोजित एका कार्यक्रमात हिंदू धर्मावर आपले मत मांडले होते. त्यावर विरोधी पक्षातील नेत्यांनी कडाडून टीका केली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ramdas athawale disagree to rss chief mohan bhagwats Hindu Related statement