Modi Cabinet : रामदास आठवलेंना कॅबिनेट नाही पण...

गुरुवार, 30 मे 2019

रामदास आठवले यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी देण्यात येईल, असे सांगितले जात होते. मात्र, आता त्यांना पुन्हा राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए-2 सरकारचा शपथविधी सोहळा आज (गुरुवार) पार पडत आहे. यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना मोदी सरकारमध्ये स्थान देण्यात आले आहे. आठवले यांना राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

राष्ट्रपती भवनाच्या प्रांगण येथे नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाचा शपथविधी आज संपन्न झाला. मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात मोदींसह सुमारे 50 मंत्र्यांचा शपथविधी पार पडत आहे. यामध्ये एनडीएतील घटक पक्ष असलेल्या आरपीआयला स्थान देण्यात आले आहे. मोदी सरकारच्या या नव्या मंत्रिमंडळात रामदास आठवले यांना पुन्हा एकदा स्थान देण्यात आले आहे.

दरम्यान, रामदास आठवले यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी देण्यात येईल, असे सांगितले जात होते. मात्र, आता त्यांना पुन्हा राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramdas Athawale is takes Oath as Minister for State