
न्यायालयातून बाहेर पडताच रामदास कदम म्हणाले, दडपशाही झेलत...
बेळगाव: महाराष्ट्र विधानपरिषद विरोधीपक्ष नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांना खानापूरमधील (Khanapur) ११वे जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी आज (ता.११) अटकपूर्व मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र एकीकरण समीतीतर्फे २००६ मध्ये खानापूरमधील ताराराणी मैदानावर मराठी भाषकांनी युवा मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यातील भाषण कर्नाटकाला (Karnataka) चांगलेच झोंबल्याने कदम यांच्यावर प्रक्षोभक भाषण केल्याबाबत ठपका ठेवत ऑक्टोबर २००६ मध्ये गुन्हा नोंदवला. दाव्यात जामीन मिळाला आहे.
हेही वाचा: 'मी पुन्हा येईन' या नादात माझाच फोन टॅपिंग; एकनाथ खडसे
सीमालढ्याला अधिक धारदार, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि मराठी भाषकांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी खानापूर येथील ताराराणी हायस्कूल मैदानावर मराठी भाषकांचा युवा मेळावा २७ ऑक्टोबर २००६ रोजी आयोजिला होता. मेळाव्याचे उद्घाटन तत्कालीन महाराष्ट्राचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते कदम यांनी केले. त्यानंतर भाषणामध्ये त्यांनी सीमाप्रश्न लढा आणि येथील जुलमी अत्याचार विरोधात परखड भुमिका मांडली. शिवाय तत्कालीन मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचाही समाचार घेतला होता. या टिकेबद्दल कर्नाटक पोलिसांनी कदम यांच्यावर खानापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
हेही वाचा: गिरगांव कोर्टाबाहेर FB Live करणारा सच्चिदानंद पुरी पोलिसांच्या ताब्यात
तर २८ नोव्हेंबर २००७ रोजी दोषारोपत्र दाखल झाले. दाव्याची सुनावणी सुरु झाली. त्याला कदम हे उपस्थित राहिले नाही. त्यासाठी समन्स बजाविले. नंतर अटक वॉरंट बजाविले. अलिकडे अटक वॉरंटसह प्रोक्लेमेशन (मालमत्ता जप्त करणे) आदेश न्यायाधीशांनी बजाविला. त्यामुळे कदम उपस्थित राहून अटकपूर्व जामीन मंजूर करून घेतला. समिती कार्यकर्ते यशवंत बिर्जे व महादेव घाडी जामीनदार झाले.कदम यांच्यावतीने ॲड. शामसुंदर पत्तार, ॲड. हेमराज बेंचण्णावर व ॲड. जोतिबा पाटील यांनी काम पाहिले.दरम्यान, दाव्याच्या सुनावणीनिमित्त माजी महापौर शिवाजी सुंडकर, महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर, नारायण मुचंडीकर, वासू सामजी, युवा समितीचे उपाध्यक्ष सचिन केळवेकर उपस्थित होते.
हेही वाचा: सूडबुद्धीने माझ्यावर कारवाई सुरु; दरेकरांचे आघाडीवर टीकास्त्र
सीमाप्रश्न निर्णायक टप्प्यावर; रामदास कदम
न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले,‘‘सीमाभागातील मराठी भाषकांची व्यथा जाणून आहे. सीमाप्रश्न निर्णायक टप्प्यावर एकसंघ गरजेचे आहे. दडपशाही झेलत मराठी जपणाऱ्यांचे कौतुक आहे. सदैव म. ए. समितीच्या पाठीशी आहे.’’
Web Title: Ramdas Kadam Granted Pre Arrest Bail Karnataka News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..