
"मी शिवसेना सोडणार नाही, पण मुलं..."
शिवसेना (Shivsena) नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी अनिल परब (Anil Parab) यांच्या वादाबद्दल आज अनेक मोठी वक्तव्य केली आहेत. अनिल परब हे वारंवार आपण भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या छापून आणतात असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहेत. याच पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. रामदास कदम हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू होती, मात्र आता रामदास कदम यांनी आपण पक्ष सोडणार नसल्याचं स्पष्ट केलंय.
हेही वाचा: परब गद्दारी करतायेत...रामदास कदमांनी ठाकरेंना दिलेलं पत्र फोडलं!
एका कथिक ऑडिओ क्लिप प्रकरणापासून सुरू झालेला अनिल परब आणि रामदास कदम यांच्यातील वाद आता टोकाला पोहोचला आहे. त्यानंतर आज त्यांनी या सर्व प्रकरणावर बोलताना अनेक मोठे खुलासे केलेले आहेत. अनिल परब यांनी वारंवार आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात, ते माझ्या मुलाचं तिकीट कापण्याचा प्रयत्न करतात, तसेच त्यांनी शिवसेनेला राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचं काम केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
परब हेच खरे सेनेतील गद्दार आहेत. आणि ते सेनेच्या मुळावर उठल्याचा आरोप कदम यांनी केला. अनिल परब रत्नागिरीचे पालकमंत्री असले तरी ते जिल्ह्यात कधीही फिरकत नाहीत. फक्त झेंडावंदनाला हजेरी लावतात. त्यामुळे जिल्ह्यात काय चाललंय, याची त्यांनी जाणीव नाही. रत्नागिरीतील शिवसेना राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचा त्यांचा डाव असल्याचं कदम म्हणाले. त्यामुळे आता अन्याय सहन करण्याला देखील काही मर्यादा असतात असं म्हणत आपण तर पक्ष सोडणार नाही मात्र आपले मुलं त्यांचा निर्णय घेण्यास समर्थ असल्याचं त्यांनी सांगितलं.
रामदास कदम यांनी आज आपल्या व्यक्त केल्यानंतर ते शिवसेना सोडणार नाहीत मात्र त्यांची मुलं येणाऱ्या काळात भाजपमध्ये जाऊ शकतात अशी शक्यता निर्माण झाली आहे. तरी लवकरत आपण याबद्दलची घोषणा करु असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Web Title: Ramdas Kadam Son Likely To Join Bjp Shivsena Anil Parab Uddhav Thackeray Audio Clip
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..