
योगगुरु बाबा रामदेव यांच्या अडचणीत आणखीच वाढ झाली आहे. केरळमधील एका न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. रामदेव बाबांसोबत पतंजलि योगपीठाचे अध्यक्ष आचार्य बालकृष्ण यांच्याविरोधातही वॉरंट जारी करण्यात आलंय. पलक्कड जिल्हा कोर्टाने दोघांविरोधात हे वॉरंट जारी केलं असून सुनावणीला उपस्थित न राहिल्यानं कारवाई करण्यात आलीय. केरळच्या ड्रग्ज इन्स्पेक्टरने दिव्य फार्मसीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू आहे.