
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढलेला असतानाच योगगुरु रामदेव बाबा यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. पुढील गुरुकुल लाहोर आणि कराचीमध्ये बांधणार असल्याचे रामदेव बाबांनी म्हटले आहे. पाकिस्तानचे अनेक प्रांत स्वातंत्र्याची मागणी करत आहेत, त्यामुळे पाकिस्तान आधीच तुटलेला आहे, भारताशी लढण्याची हिंमत त्यांच्यात नाही. असे त्यांनी म्हटले.