
ज्यावेळी हे औषध लाँच झाले होते. त्यावेळीही मोठा वाद निर्माण झाला होता. कंपनीच्या क्लिनिकल ट्रायल आणि त्याच्याशी निगडीत आकडेवारीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
नवी दिल्ली- जगभरासह देशावर कोरोनाचे अभूतपूर्व संकट कोसळले आहे. परंतु, यातही रामदेव बाबा यांची कंपनी पतंजलीने अवघ्या 4 महिन्यांत 85 लाखांहून अधिक कोरोनिल किटची विक्री केली आहे. कंपनीच्या आकडेवारीनुसार या कालावधीत औषधांची एकूण विक्री ही सुमारे 241 कोटी रुपये आहे.
कंपनीच्या अधिकृत आकडेवारीनुसार, 18 ऑक्टोबर ते 23 जून दरम्यान एकूण 23.54 लाख कोरोनिल किटची विक्री झाली आहे. कोविड-19 वरील उपचारासाठी म्हणून 'कोरोनिल' 23 जून रोजी लाँच केले होते. परंतु, हे औषध कोरोनावर उपयोगी आहे की नाही हे अद्यापपर्यंत सिद्ध झालेले नाही. ज्यावेळी हे औषध लाँच झाले होते. त्यावेळीही मोठा वाद निर्माण झाला होता. कंपनीच्या क्लिनिकल ट्रायल आणि त्याच्याशी निगडीत आकडेवारीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
हेही वाचा- काँग्रेस नेत्याची 'दे धुलाई', मुलींची छेड काढल्याचा आरोप
कंपनीने यापूर्वी खोकला, ताप आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध म्हणून कोरोनिलला मान्यता मिळली होती. 24 जून रोजी उत्तराखंड आयुष विभागाने पतंजलीला नोटीस जारी करुन 7 दिवसांत उत्तर मागितले होते. उत्तराखंड आयुष विभागाच्या परवाना अधिकाऱ्यांनी पतंजलीला इम्युनिटी बुस्टर तयार करण्याचा परवाना दिल्याचे जाहीररित्या सांगितले होते.
हेही वाचा- सत्तेसाठी दोन-दोन युवराजांची धडपड; पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका
कोरोनावरील औषध म्हणून केली जात असलेली कोरोनिलची जाहिरातही आयुष मंत्रालयाने रोखली होती. खोकला, ताप आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध म्हणूनच याची जाहिरात करण्यास सरकारने सांगितले होते. यापूर्वी पतंजलीला कोरोनिल ब्रँडच्या वापरासाठी मद्रास उच्च न्यायालयाने 10 लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. त्याचबरोबर कोरोनिल शब्दाचा वापर करण्यास मनाई केली होती. कोरोनिलची किंमत 545 रुपये ठेवण्यात आली होती.