रांची (झारखंड) : राज्याच्या राजधानीत एक अत्यंत वेदनादायक घटना समोर आली आहे. पत्नी आणि सासरच्या लोकांच्या मानसिक छळाला (Husband Harassment Allegation) कंटाळून चुटिया परिसरातील गोसाईं टोली येथील अनिल साहू या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्रासाचा पाढा वाचला. या प्रकरणात पोलिसांनी (Police) पत्नी आणि सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.