Rani Laxmibai : क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता झाशीची राणी यांचा थोडक्यात जिवनप्रवास सांगण्याऱ्या '9' गोष्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rani Laxmibai

Rani Laxmibai : क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता झाशीची राणी यांचा थोडक्यात जिवनप्रवास सांगण्याऱ्या '9' गोष्टी

"खूब लडी मर्दानी वो तो झाँसीवाली रानी थी" कवयित्री शुभद्रा कुमारी चौहान यांच्या "झांसी की रानी" या कवितेतील या ओळी राणी लक्ष्मीबाईच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी सर्वात अचूक आहेत. भारतीय इतिहासात राणी लक्ष्मीबाई यांना भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक मानले जाते. 

आज राणी लक्ष्मीबाईंची यांची आज जयंती. राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 रोजी वाराणसी इथं झाला. त्यांच्या वडिलांचं नाव मोरोपंत तांबे आणि आईचं नाव भागीरथी बाई होतं.

1) धोरणी, चतुर, युद्धशास्त्र निपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाई मूळच्या कोणत्याही राजघराण्यातील नव्हत्या. पण राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या मनकर्णिका - मनु होत्या. 

2) झाशीच्या लहानपणापासूनच दृढनिश्चयी होत्या...

लहानपणापासूनच पुरुषांसारखीच आपणही सगळी कामं करु शकतो असं मनुला वाटत होतं. एकदा त्यांनी मित्र असलेले नाना यांना हत्तीवरून फिरताना पाहिलं. त्यावेळी हत्तीची सवारी करण्याची त्यांनी नानांकडं बोलून दाखवली. त्यास नानांनी नकार दिला. हत्तीवरुन फिरण्याचं हे वय नाही असं नानांना वाटलं. ही गोष्ट मनुच्या जिव्हारी लागली. एक दिवस आपल्याकडंही हत्ती असतील, असं त्यांनी नानांना सांगितलं. एकच नव्हं तर, दहा हत्ती असतील, असंही त्या म्हणाल्या. झाशीची राणी झाल्यावर त्यांचं हे बोलणं खरं ठरलं.

3) अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातील प्रत्येक विद्येत प्रावीण्य मिळविले.

बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी ‘मल्लखांब’ नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणार्‍या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या.

हेही वाचा: Winter Recipe: जवसची खमंग चटणी कशी तयार करायची?

4) झाशीच्या प्रमुख झाल्या राणी लक्ष्मीबाई

1834 साली मणिकर्णिकाचा झाशीचे राजा गंगाधर राव यांच्यांशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर त्यांचं नाव लक्ष्मीबाई ठेवलं. अवघ्या 18 वर्षांच्या असताना त्या झाशीच्या प्रमुख झाल्या होत्या.

5) मुलाला दत्तक घेतलं

1851 रोजी त्यांना एक मुलगा झाला. अवघ्या चार महिन्यांतच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी आनंद राव नावाच्या मुलाला दत्तक घेतलं. त्याचं नाव दामोदर राव असं ठेवलं.

हेही वाचा: History of Teachers' Day: शिक्षक दिनाचा नेमका इतिहास काय आहे?

6) लक्ष्मीबाईनी पुरुषी पोषाखात वावरण्याचे का ठरवले? 

21 नोव्हेंबर 1853 रोजी लक्ष्मीबाईंचे पती गंगाधर यांचा मृत्यू झाला. पतीच्या निधनाचे दुःख काळजात पचवून लक्ष्मीबाईने पुरुषप्रधान संस्कृती असणार्‍या समाजाने एका विधवा राणीला दुर्लक्षित करू नये म्हणून त्यांनी धोरणीपणाने पुरुषी पोषाखात वावरण्याचे ठरवले. 

7) राज्य करण्यासाठी आपण समर्थ आहोत हे सिद्ध करण्यासाठीच त्यांनी गंगाधर रावांच्या निधनानंतर स्वत:च्या नावाची (उर्दू भाषेतील)  मोहोर करून घेतली. त्या काळात उर्दूमधे मोहोर असणे याचा अर्थ ‘सत्ताग्रहण आणि राजमान्यता’ असा होता. त्यानंतर 27 फेब्रुवारी 1854 रोजी लॉर्ड डलहौसीने दत्तक कायद्यांतर्गत दामोदर राव यांचे दत्तकत्व अस्वीकृत असल्याचे सांगितले. झाशीचा ब्रिटीश राजवटीत समावेश करावा अशी डलहौसीने घोषणा केली. लक्ष्मीबाईंनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आणि इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले.

हेही वाचा: Winter Hair Dandruff : हिवाळ्यात केसामध्ये खूप कोंडा होत असेल तर 'हे' उपाय करून बघा...

8) मुलाला पाठीवर बांधून लक्ष्मीबाई लढाई लढल्या.

लक्ष्मीबाई यांनी इंग्रजांशी निकरानं झुंज दिली. दोन्ही हातात तलवार घेऊन घोड्यावर स्वार होऊन, मुलाला पाठीवर बांधून त्या इंग्रजांशी लढल्या. पण, इंग्रजांच्या विशालकाय सैन्यदलासमोर झाशीच्या सैन्याचा निभाव लागणं शक्य नव्हतं. शेवटी इंग्रजांनी झाशीवर विजय मिळवला.

हेही वाचा: Winter Recipe: पौष्टिक बीटरुटचे लाडू कसे तयार करायचे?

9) काय होती लक्ष्मीबाईची अखेरची इच्छा?

1858 च्या लढाईत  लढाईत राणी लक्ष्मीबाई पूर्णपणे घायाळ झाल्या होत्या. तेव्हा लक्ष्मीबाईने सांगितले होते की ''माझ्या देहाला इंग्रजांचा स्पर्श होता कामा नये. त्याआधी माझा देह जाळून टाका आणि माझ्या दामोदरला सांभाळा!'

एवढे बोलून राणीने श्वास सोडला. त्यांच्या इच्छेप्रमाणे कारवाई करत उपस्थित दोघांनी मंदिराच्या मागच्या परिसरात लाकडांची जुळवाजुळव करत राणीच्या देहाला अग्नी दिला. राणी लक्ष्मी बाईंचा आत्मा पंचतत्त्वात विलीन झाला. मात्र तिच्या लढ्याने इंग्रजांमध्ये प्रचंड घबराट पसरली आणि हिंदूंच्या करारीपणाचा त्यांना प्रत्यय आला. 

मृत्यूनंतर देहाला इंग्रजांनी हात लावू नये अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेप्रमाणं काही सैनिकांनी लक्ष्मीबाईंना जखमी अवस्थेतच बाबा गंगादास यांच्या कुटीपर्यंत पोहोचवलं आणि कुटीतच त्यांनी 18 जून 1858 ला प्राण सोडले. तिथंच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :womencultureHistory