
Summary
रणथंबोर नॅशनल पार्कमध्ये सफारीदरम्यान कॅन्टर जंगलात बिघडल्याने पर्यटक अंधारात अडकले.
गाईड पर्यटकांना सोडून पळून गेला, ज्यामुळे महिला आणि मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
तक्रारीनंतर वनविभागाने गाईड व चालकांसह चौघांवर निलंबनाची कारवाई केली.
राजस्थानच्या सवाई माधोपूर रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात पर्यटकांच्या सुरक्षेशी संबंधित एक मोठी निष्काळजीपणा समोर आला आहे. वाघांनी भरलेल्या जंगलाच्या मध्यभागी पर्यटकांना वाऱ्यावर सोडून गाईड पळून गेला. यामुळे भीतीच्या सावटाखाली पर्यटकांना काही वेळ अडकून राहावे लागले. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश होता. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान या प्रकरणी वनविभागाने कठोर कारवाई करत गाईडसह चौघांचे निलंबन केले आहे.