esakal | रेल्वे मंत्रालयाचे कामकाज सोळा तास चालणार : रावसाहेब दानवे
sakal

बोलून बातमी शोधा

रावसाहेब दानवे

रेल्वे मंत्रालयाचे कामकाज सोळा तास चालणार : रावसाहेब दानवे

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : प्रवाशांना उत्तम सुविधा मिळावी, यासाठी रेल्वे राज्यमंत्री कार्यालयाचे कामकाजात बदल करीत सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत या दोन शिफ्टमध्ये चालविण्याचा निर्णय केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे Union Minister Of State For Railway Raosaheb Danve यांनी शुक्रवारी (ता.नऊ) घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर सर्व केंद्रीय मंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांनी बैठक घेतली. तसेच कामकाजाची दिशा ठरवून दिली. गुरूवारी (ता.आठ) केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पदभार स्विकारला. त्यानंतर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रेल्वे विषयक Railway Ministry Timetable सद्य:स्थितीची आढावा घेतला. raosaheb danve decision, railway ministry work 16 hours

हेही वाचा: पावसाचा अजब खेळ! भोकरदनमध्ये अर्ध्या भागातच पाऊस

तसेच प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांसह रेल्वे व्यवस्थापनाच्या अडीअडचणी, तांत्रिक बाबींची माहिती घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर श्री. दानवे यांनी आपल्या मंत्री कार्यालयाचे कामकाजाच्या वेळत वाढ केली आहे. यामध्ये सकाळी सात ते दुपारी चार आणि दुपारी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत अशा दोन शिफ्ट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रेल्वेच्या कामकाजाला गती मिळेल, असा विश्वास श्री. दानवे यांनी व्यक्त केला आहे.

loading image