esakal | पावसाचा अजब खेळ! भोकरदनमध्ये अर्ध्या भागातच पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

भोकरदन (जि.जालना) : शहरात अर्ध्या भागात पाऊस झाला, तर अर्धा कोरडा.

पावसाचा अजब खेळ! भोकरदनमध्ये अर्ध्या भागातच पाऊस

sakal_logo
By
दीपक सोळंके

भोकरदन (जि.जालना) : शहरासह Bhokardan परिसरात शुक्रवारी (ता.नऊ) दुपारी चार वाजेच्या सुमारास अर्ध्या शहरात पावसाने काही वेळ हजेरी लावली. तर अर्धा भाग कोरडाच राहिला. पावसाच्या या अजब खेळाची शहरात चर्चा रंगली होती. दरम्यान या पावसाने उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. तालुक्यात मागील वीस दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. परिणामी Jalna अनेक भागात दुबार पेरणीचे Sowing संकट उभे राहिले असून, उन्हाळ्याप्रमाणे कडक ऊन तापत असल्याने उकाड्यात मोठी वाढ झाली आहे.rain in some parts of bhokardan marathi news

हेही वाचा: कन्नड तालुक्यात पावसाचे पुनरागमन, पिकांना तात्पुरते जीवदान

गुरुवारी (ता.आठ) दुपारी चार वाजता वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर काहीवेळ पावसाने Rain हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दरम्यान दुसऱ्या दिवशी शुक्रवारीही शहरातील म्हाडा कॉलनी परिसर, सिल्लोड नाका, एमआयडीसी आदी भागात पाऊस झाला. तर जुन्या शहरात व मुख्य बाजारपेठेत पाऊस झाला नाही. तालुक्यातील अद्याप दमदार पाऊस नसल्याने नदी, नाले यासह लहान, मोठे जलसाठे अद्यापही तहानलेले आहेत. त्यामुळे तालुक्यात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

loading image