मुलाखतीच्या नावाखाली महिलेवर बलात्कार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

कोलकता - नोकरीच्या मुलाखतीसाठी गेलेल्या एका महिलेवर मुलाखतकर्त्याने आणि त्याच्या सहकाऱ्याने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत बेनियापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित महिलेची सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलाखतकर्त्याशी ओळख झाली होती. त्यानंतर तिला मुलाखतीसाठी एका हॉटेलमध्ये बोलविले होते. पीडित महिला ज्या वेळी मुलाखतीसाठी हॉटेलमध्ये पोचली, तेव्हा मुलाखतकर्त्याच्या सहकाऱ्याने तिच्यावर बलात्कार केला. पीडित महिला किंचाळल्यानंतर हॉटेलमधील काही कामगारांनी तिची सुटका केली.

Web Title: Rap on the name of inteview